दिल्लीतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी सोमवारी सांगलीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:40+5:302020-12-13T04:40:40+5:30

ते म्हणाले, गेल्या दहा दिवसांपासून दिल्ली आंदोलनाला पाठिंबा म्हणून किसान बाग आंदोलन सुरू आहे. दररोज रात्री सात ते नऊ ...

To hold a rally in Sangli on Monday in support of the agitation in Delhi | दिल्लीतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी सोमवारी सांगलीत धरणे

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी सोमवारी सांगलीत धरणे

ते म्हणाले, गेल्या दहा दिवसांपासून दिल्ली आंदोलनाला पाठिंबा म्हणून किसान बाग आंदोलन सुरू आहे. दररोज रात्री सात ते नऊ या वेळेत स्टेशन चौकात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबर रोजी सांगली बंद करण्यात आली होती. अद्यापही सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळेच आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी देशव्यापी पुन्हा आंदोलनाचा जोर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून येथील स्टेशन चौकात दि. १४ दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाला सर्व पक्ष, संघटना व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन महेश खराडे यांनी केले आहे.

सांगलीतील बैठकीस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष काॅ. उमेश देशमुख, हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, मुनीर मुल्ला, राहुल पाटील, तोहिद शेख, संदीप कांबळे, ओम भोसले, राजू कांबळे उपस्थित होते.

Web Title: To hold a rally in Sangli on Monday in support of the agitation in Delhi