होलार समाजाचे प्रश्न सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:16+5:302021-06-25T04:20:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : ः होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या ...

होलार समाजाचे प्रश्न सोडविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : ः होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्याबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेऊ. या समाजातील विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
मुंबई येथे मंत्रालयात होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलत होते . यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योती गजभिये, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, समाज कल्याण विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम ऐवळे. माणिकराव भंडगे आदी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्व नमुने निर्णय घेण्यात येईल. होलार समाज या संदर्भात बार्टीने नव्याने या जातीचा अभ्यास करावा .जातीच्या नोंदी जेव्हा नव्याने केल्या जातील तेव्हा त्या अगदी काटेकोरपणे करण्यावर भर द्यावा. या समाजाने महामानवाच्या यादीसाठी जी नावे सुचवली आहेत त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल. स्टँडअप योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या समाजातील जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावे. यासाठी नव्याने धोरण तयार करण्यात येत असून लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.