आटपाडीतील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम चालू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:03 IST2021-03-18T17:50:46+5:302021-03-18T18:03:56+5:30
Pwd Sangli- आटपाडी येथील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चालू करणार असुन निधी कमी पडून देणार नसल्याची माहीती कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी आज दिली.

आटपाडीतील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम चालू करणार
सुरेंद्र दुपटे
संजयनगर/सांगली : आटपाडी येथील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चालू करणार असुन निधी कमी पडून देणार नसल्याची माहीती कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी आज दिली.
मौजे आटपाडी येथील होलार समाज मंदिराचे काम रखडल्याने ते आठ दिवसात सुरू करण्याचे निवेदन होलार समाज समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांनी दि. 10 मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्याची दखल घेत कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी निधी कमी पडून देणार नसल्याची माहीती दिली. मंदीराचे काम रखडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी आज, तत्काळ बैठक बोलवून आटपाडी येथील होलार समाजाचे काम येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चालू करणार असल्याचे सांगून येणाऱ्या अडचणी दुर करुन समाज मंदिराचे काम मार्गी लावू अशी ग्वाही दिली.
या बैठकीत दिनकर हातेकर, बाळासाहेब हेगडे, सांगली जिल्हा अध्यक्ष आनंदराव ऐवळे, युवा शक्ति राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे उपस्थित होते.