मुदत संपूनही होर्डिंग ठेक्याची निविदा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:09+5:302021-09-22T04:29:09+5:30

सांगली : शहरातील विद्युत पोलवरील जाहिरात फलक ठेक्याची मुदत संपवून नवीन निविदा मागविण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालढकल केली आहे. त्यामुळे ...

The hoarding contract is not tender even after the deadline | मुदत संपूनही होर्डिंग ठेक्याची निविदा नाही

मुदत संपूनही होर्डिंग ठेक्याची निविदा नाही

सांगली : शहरातील विद्युत पोलवरील जाहिरात फलक ठेक्याची मुदत संपवून नवीन निविदा मागविण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालढकल केली आहे. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्याची गंभीर दखल घेत तातडीने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील राजवाडा चौक ते पुष्पराज चौक, विश्रामबाग उड्डाण पूल, शंभर फुटी रस्ता, हरभट रोडसह विविध ठिकाणच्या विद्युत पोलवर जाहिरात फलक लावले जात आहेत. त्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून निविदा मागविल्या जातात. यातून पालिकेला १० ते १२ लाखांचे उत्पन्न मिळते. शिवाय या पोलची देखभालही होते. पण जाहिरात फलक ठेक्याची मुदत संपून सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. कोरोनाचे कारण देत नव्याने निविदा मागविण्यास टाळाटाळ करण्यात आली.

मुदत संपल्यानंतरही ठेकेदाराने विद्युत पोलवरील जाहिराती सुरूच ठेवल्या आहेत. त्यातून ठेकेदार मालामाल झाला, पण पालिकेच्या तिजोरीत दमडीही जमा होऊ शकली नाही. हा प्रकार आयुक्त कापडणीस यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने मालमत्ता विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मालमत्ता विभागाने निविदेच्या फायलीचा शोध घेतला. पण ही फाईल विद्युत विभागाकडे प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे. मुदत संपल्यानंतर विद्युत विभागानेच निविदेसाठी मालमत्ता विभागाकडे फाईल पाठविणे आवश्यक होते. पण त्यातही विलंब करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

चौकट

ठेकेदारावर फौजदारीच्या हालचाली

विद्युत पोलवरील जाहिरातीची मुदत संपल्यानंतर विद्युत विभागाकडून ठेकेदाराला एक नोटीस बजाविण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले; पण नवीन निविदा काढण्यास मात्र चालढकल करण्यात आली. दरम्यानच्या काळात ठेकेदाराने विद्युत पोलवर जाहिराती लावल्याचे मालमत्ता विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे आता ठेकेदारावर फौजदारी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title: The hoarding contract is not tender even after the deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.