हिवरे विवाहितेची आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:27 IST2021-03-27T04:27:29+5:302021-03-27T04:27:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : हिवरे (ता. खानापूर) येथील प्रगती महेश हसबे (वय २३) या विवाहितेचा मानसिक व शारीरिक ...

Hiware married suicide; Crime on five people | हिवरे विवाहितेची आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा

हिवरे विवाहितेची आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : हिवरे (ता. खानापूर) येथील प्रगती महेश हसबे (वय २३) या विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचजणांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पती महेश सदाशिव हसबे, सासू काशीबाई, सासरा सदाशिव रामचंद्र हसबे, नणंद मनीषा ऊर्फ रेश्मा व नणंदेचा पती प्रमोद (पूर्ण नाव माहीत नाही) अशी त्यांची नावे आहेत. प्रगतीची आई वैशाली ब्रह्मनाथ घोडके (वय ४५, रा. पाचेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथील ब्रह्मनाथ घोडके यांची मुलगी प्रगती हिचा विवाह हिवरे येथील महेश हसबे याच्याशी मे २०१७ मध्ये झाला होता. त्यानंतर केवळ तीन महिन्यांतच घरातील किरकोळ कारणावरून, स्वयंपाक येत नसल्याचे कारण सांगत तसेच लग्नात मानपान व्यवस्थित न केल्यामुळे आणि दिसायला काळी असल्याचे कारण सांगत प्रगतीचा सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. याला कंटाळून दि. २० मार्च २०२१ रोजी मध्यरात्री प्रगतीने घरात आत्महत्या केली. त्यामुळे विवाहितेची आई वैशाली घोडके यांनी शुक्रवारी (दि. २६) विटा पोलिसांत पाचजणांविरुद्ध फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Hiware married suicide; Crime on five people