शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Accident News Sangli: देवदर्शनाहून परताना नागज फाट्याजवळ ट्रकला मोटारीची धडक; दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:40 IST

भरधाव माेटार रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात माेटारीतील दाेघे ठार झाले, तर महिलेसह चालक गंभीर जखमी झाला.

ढालगाव : रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६ वर कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ पंढरपूर, तुळजापूर येथे देवदर्शन करून कोल्हापूरला जोतिबा दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव माेटार रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात माेटारीतील दाेघे ठार झाले, तर महिलेसह चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. दाेघेही मृत माण (जि. सातारा) तालुक्यातील काळसकरवाडीचे आहेत.आनंदराव शिवराम पवार (वय ६८) व माणिक साहेबराव पवार (६२) अशी मृतांची नावे आहेत, तर उषाताई आनंदराव पवार (५४) व माेटारचालक स्वप्नील आनंदराव पवार (२६) हे दाेघे गंभीर जखमी झाले.काळसकरवाडी येथील पवार कुटुंब माेटार (क्र. एमएच ११ डीए ७६५८) घेऊन देवदर्शनासाठी निघाले हाेते. तुळजापूर व पंढरपूर येथे दर्शन घेऊन ते काेल्हापूरला जाेतिबा दर्शनासाठी निघाले हाेते. पंढरपूरमधून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर नव्यानेच झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरून ते काेल्हापूरच्या दिशेने निघाले हाेते. स्वप्नील पवार हा माेटार चालवित हाेता. दुपारी १ वाजण्याच्यादरम्यान त्यांची माेटार नागज फाट्याजवळ आली.यादरम्यान कांदा घेऊन निघालेला ट्रक (क्र. एमएच २३ - ७२७०) रस्त्याकडेला उभा हाेता. भरधाव वेगाने येत असलेल्या पवार यांच्या माेटारीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागील बाजूला जाेरदार धडक दिली. अपघातात माेटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. माेटारीतील चाैघेही रक्तबंबाळ झाले. गंभीर जखमी झालेल्या आनंदराव पवार व माणिक पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंदराव यांच्या पत्नी उषाताई व मुलगा स्वप्नील हे दाेघे गंभीर जखमी झाले.घटनास्थळी धावलेल्या नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी पाठवून दिले. अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पाेलिसांचे पथक घटनास्थळी धावले. अपघातानंतर घटनास्थळी माेठी गर्दी जमल्याने वाहतुकीची काेंडी झाली हाेती. पाेलिसांनी गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, हवालदार सतीश आलदर, पोलीस विनोद चव्हाण यांनी पंचनामा केला. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा अपघाताची नाेंद कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यात झाली.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरAccidentअपघात