सांगली बसस्थानकातील कक्षाकडे हिरकणींची पाठ, प्रतिसादच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST2021-01-04T04:22:24+5:302021-01-04T04:22:24+5:30

सांगली : प्रवासात बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करता यावे यासाठी दोन ...

Hirkani's back to the room at Sangli bus stand, no response | सांगली बसस्थानकातील कक्षाकडे हिरकणींची पाठ, प्रतिसादच नाही

सांगली बसस्थानकातील कक्षाकडे हिरकणींची पाठ, प्रतिसादच नाही

सांगली : प्रवासात बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करता यावे यासाठी दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष योजना सुरू केली. सुरुवातीला वर्षभर तो सुरु राहिला, नंतर मात्र त्याकडे प्रवाशांसह सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. महामंडळाने योजनाच बंद केल्याने बाळाला दूध पाजण्यासाठी महिला प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. .

सांगली स्थानकात मागील बाजुला एका खोलीत हा कक्ष सुरु आहे. फलाटावरील महिला प्रवाशांच्या तो सहसा लक्षात येत नाही. महिन्या-दोन महिन्यात एखादी प्रवाशी महिला चौकशी करते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशसानाकडून त्याची नियमित देखभाल होत असली तरी प्रवाशांकडून मात्र प्रतिसाद नाही. कक्षामध्ये मातेला बसण्यासाठी सुस्थितीतील आसन, पिण्याचे पाणी, बंदीस्तपणा इत्यादी काळजी घेतली आहे. अधिकाऱ्यांच्या कक्षाजवळच असल्याने सुरक्षितही आहे, पण, महिलांचा प्रतिसाद नाही असे दिसून आले.

कक्षाचा वापर व्हावा यासाठी एसटीचे कर्मचारीच महिलांना आवाहन करत असतात. ध्वनीक्षेपकावरुन सुविधेची माहिती पुकारली जाते. फलाटावर बाळासह बसलेल्या महिलेला हिरकणी कक्षाची गरज असल्याबाबत विचारणा केली जाते.

घरातूनच दुधाची व्यवस्था

हिरकणी कक्ष स्थानकाच्या मागील बाजुला असल्याने महिला प्रवाशांना लगेच लक्षात येत नाही. कर्मचाऱ्यांकडे विचारणा करावी लागते. सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करण्याऐवजी घरातून दुधाची बाटली घेऊन येणे त्या पसंत करतात असेही चर्चेअंती आढळले. सांगली स्थानकात गेल्या चार-सहा महिन्यात कक्षाकडे महिला प्रवाशी फिरकलेल्या नाहीत.

हिरकणी कक्ष महिलांना चोवीस तास उपलब्ध

महिला प्रवाशांसाठी हिरकणी कक्ष २४ तास उपलब्ध आहे. मागणी करताच उघडून दिला जातो. अन्य प्रवाशांकडून त्याचा गैरवापर होऊ नये याचीही काळजी प्रशासनाकडून घेतली जाते.

- चंद्रकांत पाटील

प्रभारी स्थानक प्रमुख

वर्षभरापूर्वी सुरू केलेला कक्ष ३ महिन्यातच बंद

सांगली स्थानकातील कक्ष चोवीस तास सुरु असतो. अधिकाऱ्यांच्या केबिनलगत असल्याने भिकारी किंवा अन्य प्रवाशी तेथे घुसखोरी करु शकत नाही. एखाद्या महिलेने चौकशी केली तर लगेच उघडून दिला जातो. पण त्याचा वापर महिला करतच नाहीत असे दिसून आले. वापराअभावी तो धूळ खात पडला आहे.

----------

Web Title: Hirkani's back to the room at Sangli bus stand, no response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.