शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत ई-बस स्टेशनला उच्च न्यायालयाची स्थगिती, सांगली महापालिकेच्या योजनेस धक्का  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:04 IST

२५ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी

मिरज : येथील सातवेकर मळा येथील घरे पडून ताब्यात घेतलेल्या जागेवर महापालिकेकडून ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. याबाबत दि. २५ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.केंद्र सरकारच्या मदतीने महापालिकेतर्फे विद्युत बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी बस चार्जिंग व दुरुस्ती कार्यशाळा उभारण्यासाठी सोमवारी महापालिकेतर्फे म्हाडा कॉलनीजवळील सातवेकर मळा येथील महापालिकेच्या सात एकर जागेवर असलेले घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त करून या जागेचे सपाटीकरण सुरू करण्यात आले होते. या कारवाईविरोधात येथील रहिवासी संजय सातवेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्याने न्यायालयाने महापालिकेला म्हणणे सादर करण्याचे आदेश देऊन मंगळवारपर्यंत या जागेवर पुढील कामास स्थगिती आदेश दिले, अशी माहिती ॲड. रवींद्र लोणकर यांनी दिली.

केंद्र शासनाचा उपक्रममिरजेत या जागेत महापालिका क्षेत्रासाठी मंजूर झालेल्या ई-बस सेवेचे मुख्य टर्मिनल उभारण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारतर्फे देशभरात १६९ शहरांना पीएम ई-बस योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बस देण्यात येणार आहेत. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेस पहिल्या टप्प्यात ५० बसेसना मंजुरी मिळाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, या बसेस खरेदीसाठी केंद्र सरकार अनुदान देणार आहे.

परिवहन समिती कार्यान्वित होणारई-बसेसची देखभाल व वापरासाठी ठेकेदाराची नियुक्ती व महापालिकेची स्वतंत्र परिवहन समितीही कार्यन्वित करण्यात येणार आहे. ई-बससेवेच्या मध्यवर्ती टर्मिनलसाठी महापालिका क्षेत्रात एका ठिकाणी अडीच एकर जागा आवश्यक होती. मिरजेत सातवेकर मळा येथे जागा उपलब्ध असल्याने मिरजेत मध्यवर्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानुसार या ठिकाणी चार्जिंग स्टेशनसह ई-बसच्या दुरुस्तीसाठी वर्कशॉप होणार आहे. मात्र आज न्यायालयाच्या आदेशामुळे या जागेवर सपाटीकरणाचे काम थांबवण्यात आले.

केंद्र उभारणीचे काम थांबलेपुणे, मुंबई या मोठ्या शहरांप्रमाणे महापालिका क्षेत्रातही ई-बस सेवा सुरू करण्यासाठी मिरजेत मध्यवर्ती केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. आता न्यायालयीन लढ्यामुळे या कामास विलंब होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sangliसांगलीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरmiraj-acमिरज