शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने सांगली तुंबली, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार; वारणा धरणाचे दोन दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 14:04 IST

चौकाचौकात पाणीच पाणी, वाहतूक विस्कळीत

सांगली : मुसळधार पावसाने सोमवारी सांगली शहर जलमय झाले. शहरातील मुख्य रस्त्यासह चौकाचौकात पाणी साचले होते. उपनगरातील काही घरांत पावसाचे पाणी शिरले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने शहराला झोडपले. तास ते दीड तास पावसाचा जोर होता. या पावसामुळे स्टेशन चौक, काँग्रेस कमिटी, शिवाजी मंडई, झुलेलाल चौकासह विविध ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. स्टेशन चौकात दोन्ही रस्त्यावर पाणी साचल्याने त्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागत होती. शिवाजी मंडईत पावसामुळे भाजी विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. मंडईत गुडघाभर पाणी होते. झुलेलाल चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.शहरातील गटारी, नाले ओव्हरफ्लो झाले होते. उपनगरातील अनेक वस्त्यांमध्ये नाल्याचे आणि पावसाचे पाणी शिरले. मोकळ्या प्लाॅटमध्ये पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. मुख्य गावठाणमध्येच रस्ते पाण्याखाली गेले होते. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरही पाणी साचून होते. काही अपार्टमेंटच्या तळघरात पाणी शिरले होते.वाहतुकीची कोंडीमुसळधार पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. स्टेशन चौक, महापालिका, झुलेलाल चौक या परिसरात वाहतुकींची कोंडी झाली होती.हातनूरसह परिसरात जोरदार पाऊसहातनूरसह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढली होती. त्यामुळे दुपारी साडेचारच्या दरम्यान जोरदार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. तर त्यानंतर बारीक रिमझिम ७ नंतर ही सुरूच राहिला. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. हातातोंडाशी आलेली कडधान्य या पावसामुळे हातातून जातात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी ७० मिलीमीटर तर रविवारी चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.वारणा धरणाचे दोन दरवाजे उघडलेशिराळा : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणाचे दोन दरवाजे तसेच दोन्ही वीजनिर्मिती केंद्रे सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली आहेत. आता दरवाजे व वीजनिर्मिती केंद्रांतून ४९८० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे पुन्हा नदीपातळीत हळूहळू वाढ होत आहे.वारणा धरण ९९.०३ टक्के भरले आहे. वारणा धरणातून दि. १ जूनपासून आजअखेर ३२.१७ टीएमसी पाणी सोडण्यात आले. तालुक्यात ही लहान-मोठ्या पावसाच्या सरी पडत आहेत. पाथरपुंज येथे १३४ मिमी पाऊस पडला असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दि.१ जून पासून २२ वेळा वारणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले होते. मात्र, पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने पुन्हा हे दरवाजे उघडले आहेत. पाणलोट क्षेत्रातील २४ तासांतील पाऊस कंसात एकूण पाऊस (मिमी मध्ये)

  • पाथरपुंज : १३४ (७१९१)
  • निवळे : नोंद नाही (५१५५)
  • धनगरवाडा : २५ (३२०६)
  • चांदोली : ७ (२७९२)
  • वारणावती : ७(२७२४)