शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात दहा मंडळात अतिवृष्टी; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:43 IST

ओढे-नाले तुडुंब 

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ३३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. वाळवा, जत, मिरज, पलूस, आटपाडी तालुक्यातील १० मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असून शेतीत पाणी साचून राहिले आहे. डाळिंब, द्राक्ष बागांसह भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती.मुंबई हवामान विभागाने जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्ह्यात धो-धो पाऊस कोसळला आहे. वाळवा तालुक्यातील पेठ, आष्टा, इस्लामपूर आणि कामेरी याठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले होते. दुष्काळी आटपाडी मंडळात ६७ मिलीमीटर तर जत तालुक्यातील उमदी मंडळात चाेवीस तासांत ७४.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पलूस तालुक्यातील पलूस, कुंडल मंडळातही मुसळधार पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहिले होते. या भागात भाजीपाला ही मोठ्या प्रमाणात असून त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. शिराळा तालुक्यात मांगले आणि मिरज तालुक्यातील बेडग मंडळातही धुवाधार पाऊस झाला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजलेपासून सांगली, मिरज शहरात पावसाने उघडीप दिली होती. जिल्ह्याच्या काही भागामध्येही किरकोळ पावसाने हजेरी लावली.

या मंडळात अतिवृष्टीशुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मिरज तालुक्यातील बेडग मंडळात ६५.३ मिलीमीटर, जत तालुक्यातील उमदी मंडळात ७४.८ मिलीमीटर, वाळवा तालुक्यातील पेठ मंडळात ७०, आष्टा ६५.५, इस्लामपूर ८०.३, कामेरी ७१.५, शिराळा तालुक्यातील मांगले मंडळात ६५., आटपाडी मंडळात ६७ आणि पलूस तालुक्यातील कुंडल ८८ आणि पलूस मंडळात ६७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चाेवीस तासांतील पाऊसतालुका - पाऊस (मिलीमीटर)मिरज- २२.८जत- ३५.७खानापूर- १५.३वाळवा- ५२.३तासगाव- ९.९शिराळा- ४५.१आटपाडी- ३१.९क.महांकाळ- ९.७पलूस- ५२.४कडेगाव- ३७.३