शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

सांगली जिल्ह्यात गारपीटसह जोरदार पाऊस, झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत; पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:46 IST

ऐतवडे बुद्रुक/लेंगरे/ सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह आज, गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

ऐतवडे बुद्रुक/लेंगरे/सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह आज, गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, कार्वे, डोगरवाडी, शेखरवाडी, शिवपुरी, जक्राईवाडी,  लाडेगाव व करंजवडे येथे दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. रस्त्यावर झाडे तुटून पडल्यामुळे इस्लामपूर ते चिकुर्डे व शिराळा ते आष्टा रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. तर चिकुर्डे व डोंगरवाडी येथे यात्रेतील व्यापाऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मका व ऊस पिके भुईसपाट झाली, तर वीट भट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.दुपार तीन नंतर परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. तब्बल दोन तास पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे चिकुर्डे ते इस्लामपूर मार्गावरील लाडेगाव व शिराळा ते आष्टा मार्गावरील ऐतवडे बुद्रुक येथे  अनेक झाडे रस्त्यावर तुट पडल्यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर झाडे पडल्यामुळे तारा तुटून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या परिसरात मातीच्या वीट भट्टी असल्याने वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान दमदार पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.लेंगरेत विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस मागील दोन-चार दिवसात वातावरणातील बदलामुळे उष्मा वाढला होता. परिणामी आज सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह गारपीटचा मुसळधार पाऊस झाला. लेंगरे येथे यात्रेनिमित्त आलेल्या सर्व व्यावसायिकांचे पावसामुळे हाल झाले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस