शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 22:58 IST

भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला.

शिराळा - उपवळे (ता. शिराळा) येथे बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा थरार पाहायला मिळाला. घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ९ वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ११ वर्षांच्या भावाने जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले. या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेचे प्राण वाचले आहेत.

नेमकी घटना काय?

संग्राम पाटील यांचे कुटुंब उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जेवण आटोपून शिवम आणि स्वरांजली हे दोघे भाऊ-बहीण हातात हात धरून एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला केला आणि तिची मान पकडली.

भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र, न डगमगता शिवमने तात्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि तिला मागे ओढू लागला. दरम्यान, मुलांची आई स्वप्नाली यांनीही घटनास्थळी धाव घेत आरडाओरडा सुरू केला. नागरिक जमा झाल्याचे पाहून बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. सुदैवाने, स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्याला टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात मानेत खोलवर रुतले नाहीत.  या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने सरपंच संभाजी पाटील,प्रवीण पाटील, सुनील गायकवाड,श्रीकांत पवार तसेच कुटुंबियांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉ. निलेश पाटील तिच्यावर उपचार करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे आणि वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

तडवळे दुर्घटनेच्या आठवणी ताज्यातीन वर्षांपूर्वी या गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. उपवळे येथील घटनेने या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

स्वेटर आणि टोपी ठरली 'सुरक्षा कवच'थंडीमुळे स्वरांजलीने अंगात जाड स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली होती. बिबट्याने तिच्या मानेवर झडप घातली, परंतु टोपी आणि स्वेटरच्या अडथळ्यामुळे बिबट्याची शिकार करण्याची पकड पूर्णपणे बसू शकली नाही. भावाचे शौर्य आणि हे कपडे तिच्यासाठी जीवनदान ठरले.?

English
हिंदी सारांश
Web Title : Brave boy, 11, saves sister, 9, from leopard attack.

Web Summary : An 11-year-old boy in Shirala bravely saved his 9-year-old sister from a leopard attack. The leopard attacked the girl, but her brother pulled her away, and her mother's screams scared the leopard off. The girl sustained injuries and is recovering.
टॅग्स :Leopard Attackबिबट्याचा हल्लाleopardबिबट्या