गेली दोन वर्षे सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवा करीत आहेत. मात्र, शासनाने त्यांच्यावर लाठीमार करून कोविड योध्द्यांचा अपमान केला आहे. हे कृत्य निषेधार्ह असून, बीडमधील कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा. उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी माफी मागावी, राज्यातील सर्व कोविड कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी काम द्यावे. याबाबत आठ दिवसात निर्णय घेतला नाही तर सर्व आरोग्य कामगार घेऊन २८ जून २०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा ममता कांबळे, सचिव फिरोज मोमीन, तौफीक मिरजकर, अमोल कोळी, मनोहर कांबळे, अब्दुल गफ्फार मुश्रीफ, वासंती निकम, सेरिना नदाफ उपस्थित होते.
कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांवर लाठीमाराचा आरोग्य कामगार संघटनेतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST