शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे आरोग्य अधिकारी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 15:50 IST

अकोला प्रथम, नागपूर द्वितीय, नागरिकांना दिलेल्या आरोग्य सुविधांनुसार गुणांकन

सांगली : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) स्पर्धेत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. मार्चमधील क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सांगलीचे आरोग्य अधिकारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.यापूर्वी विसाव्या क्रमांकावर असणाऱ्या सांगलीने आता थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केेंद्रांद्वारे नागरिकांना दिलेली दर्जेदार आरोग्यसेवा आणि सुविधांमुळे ही आघाडी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्याची मोहीम सुरू आहे. भौतिक सुविधा सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे केंद्रांचा कायापालट होत आहे. अनेक सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. गतवर्षी जिल्हा सातत्याने या क्रमवारीत आघाडीवर होता. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये ३८.१३ गुण मिळाले. गुणांक १.७४ ने कमी झाला. त्यामुळे क्रमवारीत घसरण झाली होती.प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी यंत्रणेत सुधारणा केल्या. त्यानंतर जिल्ह्याने पुन्हा आघाडी घेतली. पहिला क्रमांक अकोला व दुसरा क्रमांक नागपूर जिल्ह्याने पटकावला. तिसरा क्रमांक सांगलीला मिळाला.

स्पर्धेत अशी होते तपासणीप्रत्येक महिन्यात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेण्यात येते. मलेरिया, डेंग्यू, कुटुंबकल्याण अशा विविध आजार आणि योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, याचा सविस्तर आढावा घेतला जातो. प्रशासकीय कामकाजाची माहिती घेण्यात येते. त्यानंतर इतर जिल्ह्यांशी तुलना करून क्रमवारी घोषित केली जाते.

आरोग्य विभागाने नियोजनपूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याने यश मिळाले. भविष्यात जिल्हा प्रथम क्रमांक पटकावेल, यादृष्टीने नियोजन सुरू आहे. लोकसहभागातून अजून प्रभावीपणे सेवा देण्यावर आमचा भर आहे. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदHealthआरोग्य