जत जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:24 IST2020-12-24T04:24:53+5:302020-12-24T04:24:53+5:30

जत शाळा क्रमांक दोन येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांसह चार शिक्षक आहेत. येथील मुख्याध्यापकपद रिक्त आहे. चार शिक्षकांमध्ये वादाबाबत मुख्य ...

Headmaster in charge of Jat Zilla Parishad school suspended | जत जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

जत जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

जत शाळा क्रमांक दोन येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांसह चार शिक्षक आहेत. येथील मुख्याध्यापकपद रिक्त आहे. चार शिक्षकांमध्ये वादाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. मागील चार दिवसांपूर्वी डुडी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी शाळेस भेट देऊन चौकशी केली. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक जाधव यांच्याविरोधात संगीता कांबळे यांनी तक्रार दिली होती. दिव्यांगावरुन अपमान करणे, सह्यांसाठी मस्टर न देणे यासह अनेक तक्रारी होत्या. या प्रकरणाची दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. यामध्ये शिवाजी जाधव यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. संगीता कांबळे, दिगंबर जाधव आणि जैनुद्दीन नदाफ यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे डुडी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Headmaster in charge of Jat Zilla Parishad school suspended