शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: परजिल्ह्यातील तरुणीशी केली मैत्री, भेटीचे फोटो काढून लावला लग्नाचा तगादा; नकार देताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:30 IST

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित तरुणाविरोधात खंडणी, अपहरण, मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा

इस्लामपूर : परजिल्ह्यातील २६ वर्षीय तरुणीशी मैत्री केल्यानंतर एकत्रित जेवण आणि भेटीचे फोटो काढून लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाने पीडित तरुणीकडून  नकार आल्यावर जवळपास ६ ते ७ लाख रुपयांची खंडणी उकळत तिला मारहाण आणि तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार मे ते डिसेंबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी घडला.  पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून शुभम भरत माने (वय २६, रा. ताकारी, ता. वाळवा) याच्याविरुद्ध खंडणी, अपहरण, मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. माने याला शिताफीने अटक केल्यानंतर येथील न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित शुभम याने पीडित तरुणीशी असलेल्या ओळखीतून जवळीक निर्माण केली. दोघांचे एकत्रित फोटो घेतले. त्यानंतर त्याने पीडित तरुणीकडे लग्नाचा तगादा लावला. पीडितेने लग्नाला नकार देत भेटण्याचे टाळल्यावर तो आपल्याकडील फोटो कुटुंबासह समाजमाध्यमांवर पसरवून बदनामी करण्याची धमकी देत होता.मात्र, तरीही पीडित युवतीने त्याला दाद न दिल्याने शुभम याने पीडितेकडून ऑनलाइन १ लाख ४५ हजार रुपये आणि त्यानंतर पुन्हा बदनामी करण्याची धमकी देत ६ ते ७ लाख रुपये उकळले आहेत. मे महिन्यात पीडितेचे अपहरण करून मोटारीमध्येच तिला मारहाणही केली होती. त्यानंतर दुचाकीवरून पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

पीडित तरुणीच्या वडिलांच्या मोटारीच्या पुढील काचेवर दगड मारून नुकसान केले. त्यामुळे या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने मंगळवारी शुभम माने याच्याविरुद्ध फिर्याद दिली. निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयश्री कांबळे तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस