शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली धरणात गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी ३.१२ टीएमसीने पाणीसाठा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:09 IST

आनंदा सुतार  वारणावती : चांदोली धरणात सध्या ११.३० टीएमसी इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास ...

आनंदा सुतार वारणावती : चांदोली धरणात सध्या ११.३० टीएमसी इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास ३.१२ टीएमसीने पाणीसाठा यंदा कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात १४.४२ टीएमसी इतका एकूण पाणीसाठा होता. मात्र आज रोजी धरणात केवळ ११.३० टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ही ३४.४० टीएमसी इतकी असून सध्या धरणाची पाणी पातळी ३२०.०७ मीटर इतकी असून उपयुक्त पाणी साठा १२५.२३ दशलक्ष घनमीटर सध्या उपलब्ध आहे. तर गत वर्षी धरणाची पाणी पातळी ६०२.२८ मीटर इतकी असून २०४.४८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा होता. मृत संचय (डेड वॉटर स्टॉक) ६.८८ टीएमसी इतका आहे.सध्या कालव्याद्वारे २०० क्युसेक्स तर नदी पात्रात ८८५ क्युसेक असा एकूण १०८५ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणातून वीज निर्मिती केंद्रातून तसेच वारणा नदी, वारणा डावा कालवा व वाकुर्डे उपसा सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडले जाते. पाण्याच्या मागणीत वाढ होणार आहे. तरी सुद्धा चांदोली धरणामध्ये क्षमतेपेक्षा ३२.८५ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीला धरणात उपलब्ध आहे. जूनअखेर पावसाने दडी मारली तरी धरण प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करून पाण्याचे काटेकर पणे नियोजन करण्यात येत आहे.पुरेसा पाणीसाठा उपलब्ध सध्या धरणात ३२.८५ टक्के पाणी साठा उपलब्ध असून उपयुक्त पाणीसाठा १६.०७ टक्के आहे. उपयुक्त पाणीसाठा हा सिंचन क्षेत्रासाठी  केला जाणारा पाणी उपसा पाहता सद्यस्थितीला पाणीसाठा पुरेसा उपलब्ध आहे. - मिलिंद किटवाडकर उप विभागीय अभियंता वारणा कालवे विभाग

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी