शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला वारंवार द्यायचा त्रास, सासरच्या तिघांकडून जावयाच्या खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 15:54 IST

‘तू माझ्या बहिणीला त्रास देतोस काय, तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत लाकडी दांडक्याने विजय यांच्या डोक्यात जबर मारहाण केली.

इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे मुलीला त्रास देत असल्याने सासरच्या तिघांनी लाकडी दांडक्याने जावयाचे डोके फोडत खुनाचा प्रयत्न केला. हा प्रकार ३० जुलैरोजी दुपारी अडीच वाजता घडला. या हल्ल्यात विजय तानाजी जाधव (वय ३५, रा. शिवाजीनगर, बोरगाव) गंभीर जखमी झाले आहेत. ते बेशुद्धावस्थेत असून, त्यांच्यावर कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.याबाबत विजय यांची आई कलाबाई तानाजी जाधव (वय ५०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत मधुकर कवठेकर, मधुकर आनंद कवठेकर आणि राजश्री मधुकर कवठेकर (तिघे रा. शिवाजीनगर, बोरगाव) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.विजय आई आणि पत्नीसोबत बाेरगाव येथे राहतात. पत्नी नीलम हिचे माहेर घराशेजारीच आहे. या दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. चार दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्यावर नीलम माहेरी गेली होती. तिला बोलविण्यासाठी शनिवारी विजय तिच्या घरी गेले होते. त्यावेळी मेहुणा प्रशांत व सासू-सासऱ्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रशांत याने ‘तू माझ्या बहिणीला त्रास देतोस काय, तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत लाकडी दांडक्याने विजय यांच्या डोक्यात जबर मारहाण केली.डोके फुटल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ते बेशुद्धावस्थेत असून, त्यांच्यावर कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी