माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST2021-06-19T04:19:17+5:302021-06-19T04:19:17+5:30

सांगली : नवीन व्यवसाय व फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची ...

Harassment of a married woman to bring money from Maher | माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

सांगली : नवीन व्यवसाय व फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी दीपाली पंकज झुंजूरवाड (वय ३०) यांनी सासरच्या लोकांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पती पंकज सुभाष झुंजूरवाड, सासू नलिनी सुभाष झुंजूरवाड, दीर पवन सुभाष झुंजूरवाड आणि जाऊ रेणुका पवन झुंजूरवाड (सर्व रा. सदलगा ता. रायबाग) यांच्यावर गुन्हा दा‌खल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, शहरातील दक्षिण शिवाजी नगर येथील दीपाली यांचा विवाह पंकज झुंजूरवाड याच्याशी २०१४ साली झाला होता. २०१४ ते मार्च २०२१ या सात वर्षांच्या कालावधीत पतीसह सासू, दीर आणि जाऊ या चौघांनी नवीन फ्लॅट घेण्यासाठी व नवीन व्यवसायासाठी माहेरून पैसे घेऊन ये, असा तगादा लावला होता. पैसे आणण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर दीपाली यांना मारहाण करण्यात आली हाेती. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्या माहेरी आल्या व त्यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.

Web Title: Harassment of a married woman to bring money from Maher