Hang the culprits who tortured the girl in Hathras - RPI | हाथरस येथील मुलगीवर अत्याचार करणा-या नराधमांना फाशी द्या -ः आरपीआय

हाथरस येथील मुलगीवर अत्याचार करणा-या नराधमांना फाशी द्या -ः आरपीआय

ठळक मुद्देहाथरस येथील मुलगीवर अत्याचार करणा-या नराधमांना फाशी द्या -ः आरपीआयसांगलीत निदर्शने, जिल्हाधिका-यांना निवेदन सादर

सांगली- उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मागासवर्गीय मुलगीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी निषेध नोंदवत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) यांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले,या अमानवी हत्याकांडास जबाबदार असणा-या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबतची कलमे नोंदवून त्वरीत फाशी द्यावी,हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे तसेच तेथील जिल्हाधिकायांचीही चौकशी करावी अशी मागणी केली.

जेष्ठ नेते सुरेश दुधगांवकर म्हणाले,उत्तरप्रदेश सरकारचा जाहीर निषेध करित असुन ह्या तरुणीवर जाणुनबुजुन जातीय द्वेषातुन अत्याचार करण्यात आला आहे. सर्व आरोपींना कडक शिक्षा करावी.

या हत्याकांड प्रकरणी लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली जिल्हा बंद करुन तीव्र आंदोलन करु असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छाया सर्वदे,सरचिटणीस अरुण आठवले यांनीही निषेध नोंदवला.

या आदोलंनात डॉ.रविकुमार गवई, बापु सोनावणे, प्रभाकर नाईक, संतोष सरवदे, सुमन वाघमारे, नितेश वाघमारे, माणिक गस्ते, शिवाजी वाघमारे, मिलिंद कांबळे, जितेंद्र बनसोडे यांचेसह कार्यकर्ते सहभागी होते.


(फोटो ओळ-हाथरस प्रकरणी निदर्शने करताना आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे,सुरेश दुधगांवकर,अशोक कांबळे,छाया सरवदे आदी)

Web Title: Hang the culprits who tortured the girl in Hathras - RPI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.