शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विश्वजित कदम-सदाशिवराव पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा, खानापूर विधानसभेच्या उमेदवारीवर गुफ्तगू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 13:25 IST

विटा : खानापूर विधानसभेसाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय ...

विटा : खानापूर विधानसभेसाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याशी त्यांनी पारे (ता. खानापूर) येथील कार्यक्रमात सुमारे अर्धा तास चर्चा केली. महाविकास आघाडीतून एकदा उमेदवारी मिळाली की, ती जागा ताकदीने निवडणूक आणण्यासाठी निश्चित पुढाकार घेईन, असा शब्द आ. डॉ. कदम यांनी पाटील यांना दिल्याचे समजते.काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम व दिवंगत माजी आमदार अनिल बाबर यांचे निकटचे संबंध होते. हेच संबंध काही निवडणुकांमध्ये अनिल बाबर यांना उपयोगी ठरले होते. आजही या दोन कुटुंबीयांचे संबंध तेवढेच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. रामापूर-कमळापूरच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी विश्वजित कदम यांनी अनिल बाबर यांच्या कार्याचा गौरव केला होता.

सध्यस्थितीत सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीत सत्तेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीला सत्ता मिळविण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची झाली आहे. कमळापूरच्या कार्यक्रमात विश्वजित कदम व महायुतीचे सुहास बाबर एकाच व्यासपीठावर आल्याने सोशल मीडियावर राजकीय चर्चा रंगली. कदम हे बाबर यांना निश्चित मदत करतील, असे बोलले जाऊ लागले. त्यामुळे आघाडीच्या मित्रपक्षात चलबिचल निर्माण झाली होती.गुरुवारी दिवंगत ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव साळुंखे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त विश्वजित कदम व सदाशिवराव पाटील यांच्या भेटीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी खानापूरच्या जागेबाबत या दोघांत झालेल्या चर्चेत ही जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणत्याही मित्र पक्षाला मिळाली तरी काँग्रेस पूर्ण ताकदीने तो उमेदवार निवडून आणण्यासाठी पुढाकार घेईल, असा शब्द कदम यांनी सदाशिवराव पाटील यांना दिल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस पक्ष एकसंघपणे पूर्ण ताकदीने या मतदारसंघात काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाkhanapur-acखानापूरVishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेस