गुळेवाडीत तिघा चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:29 IST2021-09-26T04:29:13+5:302021-09-26T04:29:13+5:30
आटपाडी : गुळेवाडी (ता. आटपाडी) येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान चार चोरट्यांनी गावात प्रवेश करत एका मेंढपाळाची शेळी चोरली. ...

गुळेवाडीत तिघा चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले
आटपाडी : गुळेवाडी (ता. आटपाडी) येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान चार चोरट्यांनी गावात प्रवेश करत एका मेंढपाळाची शेळी चोरली. चाेरलेली शेळी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी आरडाओरड करत दोन मोटारसायकलसह आलेल्या चाैघांपैकी तिघा चोरट्यांना पकडले. तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. ग्रामस्थांनी तीनही चाेरट्यांना पाेलिसांच्या हवाली केले.
यापूर्वी विद्युत पंप व केबल चोरीला गेल्या आहेत. मात्र चोरांचा शोध लागला नव्हता. शुक्रवारी रात्री एका मेंढपाळाची शेळी चोरून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने चोरट्यांना पकडले. पोलिसांना फोन करून माहिती दिली. खरसुंडी येथील बीट अंमलदार शांताराम वगरे पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असणाऱ्या दाेन दुचाकी (क्र. एमएच ११ बीएम ७४२९ व एमएच ११ झेड ६२८३) ताब्यात घेतल्या. तिघेही चोरटे सातारा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आटपाडी पोलीस ठाण्यात याबाबत नाेंद नव्हती.