शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 15:00 IST

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.

सांगली : गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. राम मंदिर चौकात हा आनंदोत्सव भाजपाने साजरा केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना पक्षाचे नेते शेखर इनामदार म्हणाले की, हिमाचल प्रदेशच्या माध्यमातून एक नवे राज्य भाजपाला मिळाले आहे. गुजरातमधील निवडणूक तर ऐतिहासिक निवडणूक होती. येथील जनतेने सलग 22 वर्षे भाजप आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. विरोधकांनी सर्वप्रकारे भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा येथील जनतेने विश्वास टाकला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन्ही निर्णय देशातील जनतेला पटलेले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. गुजरातमधील सर्व बुथ कमिटीवरील कार्यकर्त्यांच्याही कष्टाचे हे फळ आहे. या दोन्ही राज्यातील निकालानंतर सांगली जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे. निश्चितच भविष्यातील सर्व निवडणुकांवर परिणाम करणारा हा निकाल ठरेल, असे ते म्हणाले. आनंदोत्सवात यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर, प्रकाश (तात्या) बिरजे, श्रीकांत शिंदे, गणपती साळुंखे, धनेश कातगडे, शरद नलावडे, पृथ्वीराज पाटील, दरीबा बंडगर, सुभाष माने, सुयोग सुतार, हरीपूरचे सरपंच विकास हनबर, सुभाष गडदे, स्मिता पवार, छाया हाक्के, हेमलता मोरे, गंगा तिडके, उषा गायकवाड आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Himachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस