शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दागिने, मद्यविक्रीवर करवाढीचा जीएसटीचा प्रस्ताव; उत्पादन शुल्कचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:09 IST

सध्या पाच टक्के जीएसटी आकारला जातो, तो १० ते १५ टक्के करण्याचा प्रस्ताव

सांगली : राज्य विक्रीकर विभागाने (जीएसटी) दारू आणि सोन्याच्या विक्रीवर करवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला सुचविला आहे; पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने याला सहमती दर्शविलेली नाही. करवाढ केल्यास वर्षाला ३०० ते ५०० कोटी रुपयांची महसूलवाढ होईल, असा दावा जीएसटीने केला आहे.वाढत्या वित्तीय तुटीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महसूल स्रोतांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत नुकतीच बैठक झाली. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. तीन तारांकितपेक्षा लहान रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये विकल्या जाणाऱ्या मद्यावरील करात वाढ करण्याचा प्रस्ताव यावेळी जीएसटी विभागाने दिला होता. सध्या पाच टक्के जीएसटी आकारला जातो, तो १० ते १५ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास कोल्हापूर, सांगली, सातारासारख्या छोट्या शहरांतील लहान हॉटेल्समधील मद्य महाग होणार आहे. शिवाय मुंबई, पुण्यासारख्या शहरातील तारांकित नसलेल्या हॉटेलमध्येही मद्य वाढीव किमतीला घ्यावे लागणार आहे.

२०११ पासून म्हणजे तब्बल १२ वर्षांपासून अशा हॉटेल्समधील मद्यावर करवाढ केली नसल्याकडेही जीएसटीने लक्ष वेधले आहे. चार आणि पाच तारांकित हॉटेल्समधील मद्यविक्रीवर सध्या २० टक्के कर लावला जातो; पण तेथील विक्री छोट्या हॉटेल्सच्या तुलनेत अल्प आहे. बहुतांश विक्री सामान्य हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्येच होते.'उत्पादन शुल्क'चा मात्र विरोधराज्य उत्पादन शुल्क विभागाने मात्र करवाढीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. करवाढ झाल्यास परमिट रूम आणि लहान हॉटेल्समधील मद्यविक्री घटेल, अशी भीती या विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, सोने आणि दागिने यावरील करही ३ टक्क्यांवरून चार ते पाच टक्के करण्याचा प्रस्तावही जीएसटीने सुचविला आहे; पण यावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

टॅग्स :SangliसांगलीGoldसोनंGSTजीएसटीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग