खारसुंडी कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:12+5:302021-07-05T04:17:12+5:30
खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथील नागरिकांत सध्या कोरोनाची भीती उरली नाही. नियमांना पायदळी तुडवत नागरिक विनामास्क गर्दी ...

खारसुंडी कोरोना रुग्णांची वाढ
खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथील नागरिकांत सध्या कोरोनाची भीती उरली नाही. नियमांना पायदळी तुडवत नागरिक विनामास्क गर्दी करत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण उरले नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी कमी करण्यासाठी नियोजन नाही. यामुळे नियमांचा फज्जा उडाला आहे.
सिद्धेश्वर मंदिर परिसरात लग्नसराईमुळे भाविकांचा ओघ वाढला आहे. मुख्य बाजारपेठ, बसस्थानक चौकात नेहमी गर्दी होत आहे. याकडे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन पूर्णतः दुर्लक्षच होत आहे. यापूर्वी पहिल्या लाटेत योग्य नियोजन करून ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यात यश आले होते. मात्र आजरोजी कोरोना रुग्णाची संख्या ४५ झाली आहे.
कोरोना रुग्ण गावात मोकाट फिरत आहेत. त्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे खरसुंडीत कोरोना संसर्गाचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत, दक्षता कमिटी, पोलीस प्रशासन वेळीच योग्य नियोजन करून शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी. अन्यथा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.