शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या धर्मांधतेमुळे देशाचा पाकिस्तान होईल - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:54 IST

आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यास महागाईबद्दल विचारा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

इस्लामपूर : आपला देश धर्मांधतेकडे वाटचाल करीत आहे. असे झाल्यास त्याचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. धर्मांधता कधीही विकासाचा मार्ग दाखवू शकत नाही. आपल्या आजू-बाजूचे देश धर्मांधतेकडे झुकले आणि उद्ध्वस्त झाले आहेत. आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यास महागाईबद्दल विचारा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.इस्लामपूर येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार अमोल मेटकरी, युवा नेते प्रतीक पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलचे सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर उपस्थित होत्या.यावेळी जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी हा सर्व जाती-धर्माचा पक्ष आहे. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पिढीला पुढे आणण्याचे काम आम्ही करीत आहोत. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार यशवंतराव चव्हाण आणि पवारसाहेबांनी राज्याला दिला. कोल्हापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत २३ रोजी संकल्प सभेने या परिवार संवाद यात्रेचा समारोप होईल.धनंजय मुंडे म्हणाले, राज ठाकरे हे भाजपचे अर्धवटराव आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजकारणाचा नव्हे, तर श्रद्धेचा विषय आहेत. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणारे रयतेचे राजकारण करीत आहेत. त्यांनी अठरा पगड जातीतील कार्यकर्त्यांना संधी दिली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल.अमोल मेटकरी म्हणाले, खासदार शरद पवार यांच्या हृदयात छत्रपती आहेत. तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर यांची इतकी अॅलर्जी का? हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र आम्हाला तोंडपाठ आहेत. भाजपवाल्यांनी आम्हाला धर्म व भक्ती शिकवू नये. राज ठाकरे तुम्ही अयोध्येला जाताना झेड प्लस सुरक्षा कवच घेऊन कशाला जाता? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड