शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

Sangli: जत तालुक्यातील भूजल पातळीमध्ये घट, दोन तलाव पडले कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:16 IST

विहिरी, कूपनलिकातील पाणीपातळी घटली : पाच तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली

दरीबडची : पाऊस कमी झाल्याने दुष्काळी जत तालुक्यातील भूजलपातळीतही घट झाली आहे. पाणीपातळी ४०० ते ५०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. परतीच्या पावसाने दडी दिल्याने तालुक्यातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. उमराणी, तिकोंडी हे दोन तलाव कोरडे पडले आहेत. तर उर्वरित तलावात पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे कूपनलिका, विहिरीतील पाणीपातळी कमी झाली आहे.उन्हाची तीव्रतने विहिरी, कूपनलिका, बंधारे कोरडे पडू लागले आहेत. संख मध्यम प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे. दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरु आहे. पूर्व भागातील उटगी येथील दोड्डीनाला प्रकल्पात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले होते. तेथे पाणीसाठा बऱ्यापैकी आहे. गुगवाड, खोजनवाडी, दरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ बुद्रुक व बिळूर (केसराळ) या पाच तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली आली आहे.म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी देवनाळ कालव्यातून पाच्छापूर ओढ्यातून बोर ओढ्याला पाणी सोडले होते. तसेच सिद्धनाथ तलावात पाणी आले होते. विधानसभा निवडणूकपूर्वी पाणी बंद केले आहे. सध्या तलावात पाणीसाठा ५.४० दघलफू असून ताे मृत संचयाखाली आहे. सिद्धनाथ तलावातून पाणी बोर ओढ्यातून संख मध्यम प्रकल्पात जाते.

प्रकल्पाचे नाव पाणीसाठा (द.घ.ल.फू) मध्येदोड्डानाला : २१०.१८कोसारी :  ३०.३६येळवी :  ५१.५५शेगाव क्र १ : २२१.४२वाळेखिंडी :  ११३.३१मिरवाड :  ५२.०२डफळापूर : ४०.२५बेळूखी :  ७५.४३प्रतापूर :  ५५.९४शेगाव क्र.२ : ३९.८७सनमडी :  ६६.७५रेवनाळ:  ७९.८५बिरनाळ :  ८२.८६तिप्पेहळ्ळी : ४३.८५बिळूर-केसराळ : २८.१७गुगवाड :  ६.७०उमराणी :  ०.००खोजनवाडी :  ८.३१मध्यम प्रकल्प.संख : १०.१८सिद्धनाथ :  ५.४०जालिहाळ बुद्रुक : ४.२२अंकलगी :  ५.००पांडोझरी :  १२७.९७तिकोंडी :  ०.००भिवर्गी : ३०४.६६सोरडी :  २०.०६दरीबडची :  १.६२

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी