मल्हारराव होळकर यांना डांगे संकुलात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:13+5:302021-03-17T04:28:13+5:30

ओळ : आष्टा येथे सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विक्रमसिंह पाटील, प्राचार्य सुभाष पाटील मुख्याध्यापक रघुनाथ बोते, अजित ...

Greetings to Malharrao Holkar at Dange Sankul | मल्हारराव होळकर यांना डांगे संकुलात अभिवादन

मल्हारराव होळकर यांना डांगे संकुलात अभिवादन

ओळ : आष्टा येथे सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विक्रमसिंह पाटील, प्राचार्य सुभाष पाटील मुख्याध्यापक रघुनाथ बोते, अजित पाटील यांनी अभिवादन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुलात सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, आयुर्वेदिक कॉलेज, सैनिक स्कूल, पब्लिक स्कूल, आश्रम शाळा, डी. एड., बी. एड., डी. फार्मसी, बी. फार्मसी, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, नर्सिंग कॉलेज, यांच्या वतीने शिक्षण संस्थेच्या कार्यस्थळावर उभारलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पुतळ्यासमोर जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा भगवा ध्वज अटकेपार दिमाखात फडकवणाऱ्या माळवा प्रांताचे पहिले सुभेदार आणि होळकर सत्तेचे संस्थापक सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त इंजिनिअरिंग कॉलेजचे विक्रमसिंह पाटील, सैनिक स्कूलचे प्राचार्य सुभाष पाटील, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ बोते यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. संयोजन मुख्याध्यापक रघुनाथ बोते व अमोल यादव, अजित पाटील यांनी केले.

Web Title: Greetings to Malharrao Holkar at Dange Sankul