भाजप महिला मोर्चातर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:19 IST2021-06-24T04:19:39+5:302021-06-24T04:19:39+5:30

भाजप महिला मोर्चाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले. माजी आमदार नितीन शिंदे व भाजप महिला मोर्चाच्या ...

Greetings from BJP Mahila Morcha | भाजप महिला मोर्चातर्फे अभिवादन

भाजप महिला मोर्चातर्फे अभिवादन

भाजप महिला मोर्चाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले. माजी आमदार नितीन शिंदे व भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य ज्योती कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेला हार घालण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ॲड. स्वाती शिंदे, माधुरी वसगडेकर, शैलजा कोळी, लीना सावर्डेकर, सुष्मिता कुलकर्णी, संगीता जाधव, विद्या दानोळे, मनीषा शिंदे, निकिता चव्हाण, गजानन मोरे, पंकज कुबडे, कयूम शेख, विजय शेटके, श्रीधर मेस्त्री उपस्थित होते.

-------------

भाजपतर्फे शिवप्रतिमेचे पूजन

फोटो : २३ शीतल ०५

सांगली : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी आमदार नितीन शिंदे व भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले. यावेळी ज्योती कांबळे, माधुरी वसगडेकर, शैलजा कोळी, मनीषा शिंदे, विद्या दानोळे, लीना सावर्डेकर, संगीता जाधव, निकिता चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

--------

तुळजाईनगर येथील गटारांची स्वच्छता

सांगली : प्रभाग आठमधील तुळजाईनगर येथील गटारांची स्वच्छता करण्यात आली. जेसीबी जेट राॅड मशीनच्या साहाय्याने ड्रेनेजचे पाइपही मोकळे करण्यात आले. यावेळी नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेवक राजेंद्र कुंभार उपस्थित होते.

--------

आपटा पोलीस चौकीजवळ खड्डा

सांगली : आपटा पोलीस चौकीजवळ रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे. काही महिन्यांपूर्वीच हा रस्ता डांबरी करण्यात आला होता. हे खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे अपघात होत आहेत. महापालिकेने तातडीने पॅचवर्क करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Greetings from BJP Mahila Morcha