शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत हिरव्या बेदाण्याला मिळाला उच्चांकी भाव; शेतकरी-व्यापाऱ्यांत उत्साह, किती टन झाली आवक..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:38 IST

दर्जेदार मालाला चांगला प्रतिसाद

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू हंगामातील बेदाणा सौद्याचा बुधवारी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास तब्बल ४०१ रुपये प्रति किलो, असा उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. हंगामाच्या पहिल्याच दिवशी २१ दुकानांतून दहा गाड्यांतून सुमारे १०० टन नव्या बेदाण्याची आवक झाली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!बेदाणा सौदा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सभापती सुजय शिंदे, संचालक पप्पू मजलेकर, काडप्पा वारद, सचिव महेश चव्हाण यांच्या हस्ते सौद्याचा शुभारंभ झाला. प्रमुख व्यापारी, शेतकरी व आडते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन हंगामातील सर्वाधिक भाव तीर्थंकर सेल्स कार्पोरेशन या दुकानात मिळाला. राजकुमार सदाशिव शिंगण्णा (वड्डी) या शेतकऱ्यांच्या २६ बॉक्स हिरव्या बेदाण्यास ४०१ रुपये प्रति किलो दर मिळाला. हा माल अभिजीत ट्रेडर्स यांनी उच्चांकी दराने खरेदी केला. उत्कृष्ट प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास ३३१ ते ४०१ रुपये, मध्यम हिरव्या बेदाण्यास २५० ते ३२० रुपये, तर काळ्या बेदाण्यास १२० ते १८० रुपये प्रति किलो, असा सरासरी भाव मिळाला. दर्जेदार मालाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.सौद्यावेळी मनोज मालू, सतीशभाई पटेल, सिद्धार्थ पटेल, नितीन मर्दा, पनू सारडा, विनायक हिंगमिरे, मुकेश केसरी, पवन चौगुले, रवी हजारे, विनोद कबाडे, अभिजीत पाटील, शेखर ठक्कर, परेश मालू, राजयोग कबाडे, सुनील हडदरे, शरद पाटील, ऋषभ शेडबाळे, कृष्णा मर्दा, विनीत गड्डे, प्रवीण यादवाडे, दिगंबर यादव, जितू शेटे, देवेंद्र करे आदींसह अनेक शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

बेदाण्यास उच्चांकी दर मिळणार : सुजय शिंदेसभापती सुजय शिंदे म्हणाले, यंदा द्राक्ष छाटणी उशिरा झाल्याने आणि लागवड कमी झाल्यामुळे उत्पादनात घट आहे. त्याचबरोबर बाजारातील मागणी व मार्केटिंगचा दर चांगला असल्याने चालू वर्षी बेदाण्यास साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति किलोपेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार बेदाणा सांगली बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहनही त्यांनी केले

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Raisin Auction: Record Prices Bring Cheer to Farmers

Web Summary : Sangli market sees a strong start to raisin auctions. Green raisins fetched a record ₹401/kg. 100 tons arrived from 21 shops. High prices and lower production expected to continue, benefiting farmers.