शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

द्राक्षे, डाळिंब दरात घसरण

By admin | Updated: May 19, 2017 00:27 IST

द्राक्षे, डाळिंब दरात घसरण

गजानन पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसंख : अवकाळी पाऊस, कडक ऊन, व्यापाऱ्यांची नफेखोर वृत्ती, यामुळे द्राक्षे, डाळिंबांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. औषधे, खतांच्या वाढत्या किमती, वाढता मशागतीचा खर्च, टॅँकरचा खर्च, दुष्काळी परिस्थिती यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच दरात घसरण झाल्याने जत तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. बाजारात डाळिंबे न पाठविताल ती तोडून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे.जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजाड, फोंड्या माळरानावर बागा उभारल्या आहेत. खडकाळ जमीन, स्वच्छ वातावरण, आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करीत दर्जेदार उत्पादन घेत आहेत. तालुक्यामध्ये ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. उमदी, तिकोंडी, बिळूर, संख, डफळापूर, रामपूर, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, अमृतवाडी, कोंतेव बोबलाद, करजगी, हळ्ळी, बालगाव, बेळोंडगी, जालिहाळ बुद्रुक, अंकलगी, मुचंडी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. अंकलगी, संख परिसरातील काही बागायतदार जुलै महिन्यामध्ये अगाप द्राक्ष छाटणी करतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये ते द्राक्षे बाजारात विक्रीला आणतात. तसेच बहुतांशी बागायतदार सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी घेतात. पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, करजगी परिसरामध्ये छाटणी डिसेंबरमध्ये केली जाते. हा माल एप्रिलच्या शेवटी व मे महिन्यामध्ये बाजारात येतो. अनुकूल वातावरणामुळे दावण्याचा प्रादुर्भाव कमी असतो. एकरी २५ ते २० टन कच्चा माल काढला जातो. साखर १०० टक्के भरते. बेदाण्यापेक्षा मार्केटिंगची द्राक्षे परवडतात, असे बागायतदारांचे मत आहे. जोरदार वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा धोका असतो. सध्या हा माल बाजारात आला आहे. दर कमी झाला आहे. सध्या २० रुपये किलो दराने विक्री होत आहे.तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १० हजार ३४४.५९ हेक्टर आहे. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दरीबडची, काशीलिंगवाडी, शेगाव, सोन्याळ, जाडरबोबलाद, आसंगी, उमदी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर येथील शेतकऱ्यांनी डाळिंब उत्पादन केले आहे. सध्या बाजारात डाळिंबाचा दर कमी झाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गणेश ५ ते १० रुपये किलो, तर केदार प्रति किलो १५ ते २० रुपये दराने घेतला जात आहे. दिल्ली, बेंगलोर, विजयवाडा, चेन्नई, मदुराई, नागपूर याठिकाणी अवकाळी पावसाचे कारण दाखवून डाळिंबाचा दर कमी केला आहे. दरीबडची (ता. जत) येथील अशोक जामगोंडा या शेतकऱ्याने गणेश जातीची ३ टन डाळिंबे पाठविले होती. दर कमी मिळाल्याने त्यांना स्वत:जवळील २५०० रुपये द्यावे लागले.खते, महागडी औषधे, मशागतीचा खर्च मोठा झाला आहे. लागवड खर्चसुध्दा निघत नाही. टॅँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. होणारा तोटा व पाणी नसल्याने बागा शेतकरी काढून टाकणार आहेत.चार वर्षात द्राक्षाचे घसरलेले प्रतिकिलो दरद्राक्षाची जातदर मे-एप्रिल २०१७२०१६२०१५२०१४शरद २४ रु.६८ रु.६७ रु.७१ रु.माणिक चमन२६ रु.६२ रु.५८ रु.६० रु. सुपर सोनाक्का२२ रु.६४ रु.६२ रु.६८ रु. थॉमसन२० रु.५८ रु. ५४ रु. ५२ रु.