शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Sangli: द्राक्ष बागायतदारास १६ लाखांचा गंडा, चौघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:47 IST

मुंबईतील एका व्यापाऱ्याचा समावेश

विटा : दुबई व आखाती देशात माल पाठवून चांगला दर मिळवून देतो, असे आमिष दाखवून द्राक्ष व्यापाऱ्यांनी माहुली (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदार भरत दादासो सूर्यवंशी (वय ४८) यांना १५ लाख ८७ हजार ६४८ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला.याप्रकरणी द्राक्ष व्यापारी सलीम सरदार सय्यद, अधिक विठ्ठल पवार (दोघेही रा. विटा, ता. खानापूर), पशुपती रंगनाथ माळी (रा. सावर्डे, ता. तासगाव) व गंगाराम ऊर्फ मुकुंद सुखदेव चव्हाण (रा. मुंबई) या चार द्राक्ष व्यापाऱ्यांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. माहुली येथील द्राक्ष बागायतदार भरत सूर्यवंशी यांची सहा एकर द्राक्ष बाग आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये व्यापारी सलीम सय्यद, पशुपती माळी, अधिक पवार व मुकुंद चव्हाण हे सूर्यवंशी यांच्या द्राक्ष बागेत आले. त्यावेळी त्यांनी तुमचा द्राक्ष माल आखाती देशात पाठवून चांगला दर देतो, असे सांगितले. सूर्यवंशी यांनी व्यापाऱ्यांना पर्पल काळा हा ७ हजार ५३४ किलो माल प्रत्येकी १२० रुपये किलो दराने व एसएसएन लांबडा हिरवा हा ११ हजार २४ किलो द्राक्ष माल ६२ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना दिला. त्याची एकूण रक्कम १५ लाख ८७ हजार ६४८ होती. २ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संशयितांनी सर्व माल बागेतून काढून घेतला.मात्र, सूर्यवंशी यांना पैसे दिले नाहीत. तगादा लावल्यानंतर सलीम सय्यद याने ४ लाख रुपये व दुसरा ४ लाख ५४ हजार १६० रुपये असे दोन धनादेश सूर्यवंशी यांना दिले. त्यातील चार लाखांचा एक धनादेश बँकेतून परत आला. त्यावेळी सूर्यवंशी यांनी त्याच्याशी पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

विटा पोलिसांत चौघांविरोधात फिर्यादआपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकरी भरत सूर्यवंशी यांनी शनिवारी रात्री द्राक्ष व्यापारी सलीम सय्यद, अधिक पवार, पशुपती माळी व गंगाराम उर्फ मुकुंद चव्हाण या चार द्राक्ष व्यापाऱ्याविरुद्ध द्राक्ष माल घेऊन पैसे न देता माझी १५ लाख ८७ हजार ६४८ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल विटा पोलिसांत फिर्याद दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी