शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी-भाजपपुढे गटबाजीचे आव्हान, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:01 IST

शिवसेनेची अवस्था नेत्यांना अस्वस्थ करणारी

अशोक पाटीलइस्लामपूर : वाळवा, शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यानंतर भाजप, शिवसेना, काँग्रेस असा क्रम लागतो. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीपुढे गटबाजीचे आव्हान आहे. पक्षबांधणीपेक्षा स्वत:चा गट अबाधित ठेवण्यावर स्थानिक नेत्यांचा भर असणार आहे.वाळवा तालुक्यातील ८८, तर शिराळ्यातील ६० अशा एकूण १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील गटांची बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्ता आहे. आता माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा गटही राष्ट्रवादीत गेला आहे. स्थानिक पातळीवर या पक्षात गटबाजी आहे. एकेका गावात पक्षांतर्गत तीन-तीन गट कार्यरत आहेत.भाजपची ताकदही वाढली असली तरी या दोन तालुक्यांतील पक्षाचे नेतृत्व कोणाकडे आहे, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे महाडिक गटाचे राहुल व सम्राट महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख आपापले गट मजबूत करून राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. परंतु स्थानिक पातळीवर कोण कोणाकडे जाणार हे निश्चित नसल्याने नेत्यांची दमछाक होणार आहे. भाजप पुरस्कृत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत नेमके कोणाला पाठबळ देणार, हेही गुलदस्त्यात आहे. या दोन्ही पक्षांतील गटबाजीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

शिवसेनेची अवस्था काय?शिवसेनेची अवस्था नेत्यांना अस्वस्थ करणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आनंदराव पवार जिल्हाप्रमुख आहेत, तर उद्धव ठाकरे गटाकडे अभिजित पाटील जिल्हाप्रमुख आहेत. पवार यांचा गट शहरात, तर पाटील यांची ताकद ग्रामीण भागात आहे. त्यांचे गट या निवडणुकीपुरते काही ठिकाणी राष्ट्रवादीमागे तर काही गावांत भाजपमागे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा