Gram Panchayat Election Result: वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का, महाडिक समर्थकांची बाजी
By श्रीनिवास नागे | Updated: December 20, 2022 13:48 IST2022-12-20T13:45:44+5:302022-12-20T13:48:27+5:30
Gram Panchayat Election Result: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीय यांचे होमपीच असलेल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव, रेठरे हरणाक्ष येथे राष्ट्रवादी समर्थक सरपंच. ताकारीत 'महानंद'चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांना मोठा धक्का.

Gram Panchayat Election Result: वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का, महाडिक समर्थकांची बाजी
सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीय यांचे होमपीच असलेल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव, रेठरे हरणाक्ष येथे राष्ट्रवादी समर्थक सरपंच. ताकारीत 'महानंद'चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सत्तांतरासह महाडिक समर्थक प्रा. प्रणाली पाटील सरपंच झाल्या. बिचुद येथे सर्वपक्षीय सरपंच, तर नरसिंहपूर येथे अपक्षाची बाजी मारली.
नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी, लवणमाची, बेरडमाची आणि भवानीनगर : सर्व सरपंच राष्ट्रवादी समर्थक. कासेगाव, येवलेवाडी, शेणे, येडेमच्छिंद्र येथे राष्ट्रवादी समर्थक सरपंच. किल्लेमच्छिंद्रगड येथे राष्ट्रवादीस सत्तेतून बाजूला करत सर्वपक्षीय आघाडी सत्तेत.