म्हैसाळचे पाणी पळविणाऱ्या सहा शेतकºयांविरुद्ध गुन्हा-कळंबी शाखा कालव्याचे दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:08 IST2018-04-18T01:08:51+5:302018-04-18T01:08:51+5:30
मिरज : म्हैसाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्याचा दरवाजा उघडून पाणी घेण्याचा प्रयत्न करणाºया मल्लेवाडी परिसरातील ६ शेतकºयांविरुद्ध ग्रामीण पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

म्हैसाळचे पाणी पळविणाऱ्या सहा शेतकºयांविरुद्ध गुन्हा-कळंबी शाखा कालव्याचे दरवाजे उघडले
मिरज : म्हैसाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्याचा दरवाजा उघडून पाणी घेण्याचा प्रयत्न करणाºया मल्लेवाडी परिसरातील ६ शेतकºयांविरुद्ध ग्रामीण पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. कळंबी शाखा कालव्यातून विनापरवाना पाणी घेणाºया शेतकºयांना पोलीस व म्हैसाळच्या अधिकाºयांनी पिटाळून लावले.
म्हैसाळचे आवर्तन सुरू असून, मुख्य कालव्यातून जतपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी शाखा कालव्यातून वितरण बंद करण्यात आले आहे. सोमवारी रात्री मल्लेवाडी हद्दीत कळंबी शाखा कालव्याचे दरवाजे उघडून पाणी पळविण्यात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर म्हैसाळचे अधिकारी पोलिसांसोबत तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून कालव्याचा दरवाजा उघडणाºया शेतकºयांनी पलायन केले. कालव्यातून पाण्याच्या मागणीसाठी शेतकºयांचा जमाव एकत्रित झाला होता. पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले.
मल्लेवाडी परिसरातील शेतकºयांसाठी पोटकालव्यातून यापूर्वी पाणी सोडण्यात आले असून, येथील पाणी बंद करून पुढे मालगाव परिसरात सोडण्यात येत आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकºयांची आणखी पाण्याची मागणी आहे. मात्र जतपर्यंत पाणी सोडावयाचे असल्याने एकदा आवर्तन पूर्ण झालेल्या परिसरातील पोटकालव्यातून वितरण बंद करण्यात आले आहे.
कठोर कारवाईचा इशारा
म्हैसाळचे शाखा अभियंता एस. आर. हदीमणी यांनी ग्रामीण पोलिसात सहा शेतकºयांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली आहे. कालव्यातून जबरदस्तीने पाणी घेणाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.