शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाला सूचना देणार, राज्यपालांनी केले आश्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 14:45 IST

मैलापाणी शुद्धीकरणाचा ९४ कोटींचा आराखडा

सांगली : कृष्णा नदीचेप्रदूषण रोखण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने मैला व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा ९४ कोटींचा प्रकल्प आराखडा शासनाकडे पाठविला आहे. हा विषय शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असल्याने राज्य शासनाला त्याबाबत सूचना करण्यात येतील, असे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांनी आश्वस्त केले.कृष्णा नदीच्याप्रदूषणप्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. काही तांत्रिक बाजू महापालिकेने मांडल्यानंतर हा दंड आता ३० कोटींवर आला आहे. एका बाजूला दंडाची ही टांगती तलवार महापालिकेवर आहे. शिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जात नाही. तोपर्यंत दरदिवशी एक लाखाचा दंड आकारणी हरित न्यायालयाने सुरू केला आहे.यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया व मैला शुद्धीकरणाचा ९४ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा राज्य शासन दरबारी पाठविला आहे. परंतु, शासनाकडे निधी नसल्याचे कारण देऊन हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून त्यावर कोणताही पाठपुरावा होत नाही. याविषयाची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे मांडली.दरम्यान, राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगलीतील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी बुधवारी संवाद साधला. यावेळी कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासह विविध विषयांमध्ये लक्ष घालून शासनाला सूचना देण्याविषयी सांगलीकरांना त्यांनी आश्वस्त केले.

असा आहे प्रदूषण रोखण्याचा प्रस्ताव..महापालिकेने शेरी नाल्यासह संपूर्ण सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याची ९४ कोटी रुपयांची योजना आखली. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा राज्य शासनाला सादर केला आहे. त्यामध्ये सांगलीतील महावीरनगर ट्रक पार्किंगच्या जागेत २२ दशलक्ष आणि सांगलीवाडीत ३ दशलक्ष लिटर प्रतिदिनचा मलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. शासनाकडून निधी मिळत नसल्याने हा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण