शासकीय सेवेतील काम कधीच निवृत्त हाेत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:53+5:302021-06-10T04:18:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : शासकीय सेवेत केलेले काम कधीच निवृत्त होत नाही. त्या व्यक्तीचे कामच नेहमी जनतेच्या आठवणीत ...

शासकीय सेवेतील काम कधीच निवृत्त हाेत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : शासकीय सेवेत केलेले काम कधीच निवृत्त होत नाही. त्या व्यक्तीचे कामच नेहमी जनतेच्या आठवणीत चिरंतर राहते, असे प्रतिपादन राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले.
ताकारी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अल्लाउद्दीन संदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी नूतन ग्रामसेवक अमर वाटेगावकर यांचे संदे यांनी स्वागत केले.
संदे म्हणाले माझ्या सेवेचा समाराेप एका आदर्श ग्रामपंचायतीतून होतो आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अमर वाटेगावकर यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच रवींद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी विस्तार पंचायत समिती सदस्य रुपाली सपाटे, विस्तार अधिकारी दांडगे, तलाठी ए.टी. शिकलगार, शरद शहा, युवराज निकम, सुहास पाटील, अजित वेदपाठक, संजय साळुंखे, प्रतिभा जाधव, पूनम गुरव आदी उपस्थित होते.