शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी एजन्सीच्या सेवेद्वारे ग्रामपंचायतींची शासनमान्य लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST

सांगली : ग्रामपंचायतींनी शासन नियुक्त एजन्सीकडूनच आर्थिक परतावे भरून घ्यावेत यासाठी जिल्हा परिषदेने रीतसर फर्मानच जारी केले आहे. येत्या ...

सांगली : ग्रामपंचायतींनी शासन नियुक्त एजन्सीकडूनच आर्थिक परतावे भरून घ्यावेत यासाठी जिल्हा परिषदेने रीतसर फर्मानच जारी केले आहे. येत्या सोमवारपर्यंत (दि. ३०) सर्व ग्रामपंचायतींनी संमतीपत्रे जमा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले आहेत.

शासनाने यासंदर्भातील आदेश मार्चमध्ये काढला होता. ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांच्या आर्थिक व्यवहारांच्या सुसूत्रीकरणासाठी एजन्सी आवश्यक आहे, असे म्हटले होते. त्यासाठी जयोस्तुते मॅनेजमेंट या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. टीडीएस, जीएसटी, लेबर सेस, रॉयल्टी, विमा आदींचे परतावे भरण्याचे काम एजन्सी करेल. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने वर्षाला किमान ३५ हजार रुपये ‘जयोस्तुते’ला द्यायचे आहेत. राज्यभरातील आठ हजारांवर ग्रामपंचायतींनी या प्रकारे अब्जावधी रुपये द्यायचे आहेत. ग्रामपंचायती सध्या खासगी सीए किंवा लेखापरीक्षकांकडून कामे करून घेतात. वर्षाला दोन-पाच हजारांत कामे आटोपतात. त्यांचे करार ग्रामपंचायतींनी संपवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेने काढले आहेत. ‘जयोस्तुते’कडून काम करून घेण्यासाठीची संमतीपत्रे सोमवारपर्यंत द्यावीत, असेही आदेशात म्हटले आहे.

चौकट

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना वगळले

दरम्यान, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनीही ‘जयोस्तुते’कडून कामे करून घेण्याची सक्ती केली होती. त्यासाठी वर्षाकाठी लाखो रुपयांचे सेवाशुल्क मोजावे लागणार होते. लोकप्रतिनिधींच्या विरोधानंतर फक्त ग्रामपंचायतींना सक्ती कायम ठेवण्यात आली. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामस्वराज्य अभियान यांना ही सेवा ऐच्छिक करण्यात आली आहे.

चौकट

ग्रामपंचायतींच्या पैशांची लूट

पाच हजारहून कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी प्रत्येक महिन्याला २,९८५ रुपये सेवाशुल्क द्यायचे आहे. याहून जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी ४,७१५ रुपये मोजायचे आहेत. वर्षाला ३५ हजार ८२० रुपये ते ५६ हजार ५८० रुपये द्यावे लागतील. आजवर हेच काम ग्रामपंचायती फक्त दोन ते पाच हजारांत करून घ्यायच्या. हे पैसे वित्त आयोगातून भरायचे असल्याने कशाला खळखळ करता, असा सवाल अधिकारी करीत आहेत तर इतक्या महागड्या सेवेतून कोणाचे कोटकल्याण करायचे आहे, असा प्रश्न ग्रामपंचायतींनी उपस्थित केला आहे.