शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

सांगली जिल्हा बँक कर्मचारी भरतीस शासनाची परवानगी, किती पदे भरणार.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:08 IST

शासनमान्य कंपनीकडून भरणार

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्य शासनाने नोकरभरतीस परवानगी दिली आहे. बँकेत एकूण ५०८ पदे भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या कंपनीकडूनच पार पडणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल; यामध्ये कोणताही फसवणूक होऊ नये, असा आग्रह अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.मानसिंगराव नाईक यांनी सांगितले की, राज्यातील सात ते आठ जिल्हा बँकांना नोकरभरतीस परवानगी मिळालेली आहे, त्यात सांगली जिल्हा बँकाही समाविष्ट आहे. या भरतीमध्ये ४४४ लिपीक आणि ६३ शिपाई पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी शासनाने सहा कंपन्यांचा पॅनेल तयार केला आहे. जिल्हा बँकेने या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती मागवली आहे.

संचालक मंडळाने अशा कंपनीची निवड केली आहे, ज्यांच्याविरोधात पूर्वीच्या भरती प्रक्रियेबाबत कोणतेही आरोप नाहीत आणि ज्यांची काळी यादीतही नावे नाहीत. काही लोकांकडून भरतीसंदर्भात आरोपही होऊ लागले आहेत, मात्र भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच पार पडणार असल्याचे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. ते म्हणाले की, युवकांनी कोणत्याही भ्रपशाने बळी पडू नये आणि परीक्षेसाठी योग्य प्रकारे अभ्यास करावा. सध्या बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय ४०० कर्मचाऱ्यांना वाढीव पदोन्नती देण्यात येणार असून, त्यानंतर नवीन भरती प्रक्रिया सुरू होईल. मागील साडेतीन वर्षांपासून जिल्हा बँक संचालक मंडळाचा कारभार पारदर्शक असून, नियमांचे काटेकोर पालन झाल्यामुळेच राज्य शासनाने नोकरभरतीस परवानगी दिली आहे.नियमानुसारच भरती होणारजिल्हा बँकेत होणाऱ्या नोकरभरती पूर्णपणे नियम आणि प्रक्रियेनुसार होणार आहे. या भरतीमध्ये कोणत्याही युवकाला अन्याय होणार नाही आणि शासनाने मान्यता दिलेल्या कंपनीकडूनच भरतीची सर्व प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे नोकरभरतीमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही, अशी खात्री मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Bank to recruit 508 employees with government approval.

Web Summary : Sangli District Bank gets government nod to fill 508 positions. The recruitment, including 444 clerks and 63 peons, will be transparent and conducted by a government-approved company. Existing employees will also receive promotions before the new hiring begins, ensuring fairness.