शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: गोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 13:00 IST

वंचित बहुजन आघाडीचे काम आजपासून बंद केले आहे.

सांगली : वंचित बहुजन आघाडीचे काम आजपासून बंद केले आहे. मी राजीनामा दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि भाजपा सरकार सकारात्मक आहे. पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असून, सर्व पक्षांकडून मला ऑफर असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. गोपीचंद पडळकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

सांगली लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उभे राहिलेले उमेदवार गोपीचंद पडळकर हे स्वगृही परतणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 2 दिवसांत कार्यकर्त्यांची चर्चा करून गोपीचंद पडळकर भाजपाचं कमळ हाती घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविणारे गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत.जत अथवा खानापूर मतदारसंघातून गोपीचंद पडळकर निवडणुकीला उभे राहणार असल्याचं बोललं जात आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यभरात गोपीचंद पडळकर प्रसिद्ध आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. मात्र धनगर समाजाचे प्रश्न सत्ताधारी भाजपाच सोडवू शकते, असं कार्यकर्त्यांना वाटतं. जर धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा आग्रह पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याकडे केला आहे. 

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून गोपीचंद पडळकर यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी भाजपाच्या संजयकाका पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. तब्बल 3 लाखांहून अधिक मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना जत मतदारसंघातून 53 हजार तर खानापूर मतदारसंघातून 78 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तृत्वामुळे अनेक तरुण त्यांच्यामागे उभे राहतात. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना भाजपात घेऊन जत अथवा खानापूरमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जतमध्ये विद्यमान भाजपा आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात नाराजी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जगताप यांचे तिकीट कापून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळू शकते. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019