शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीच्या धर्मांतर प्रकरणाबाबत गोपीचंद पडळकरांची विधानपरिषदेत लक्षवेधी, सखोल चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 16:47 IST

लक्ष्मण सरगर आटपाडी : आटपाडीतील ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी यांच्या भोंदूगिरीच्या प्रकारानंतर संतापाची लाट ...

लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडीतील ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी यांच्या भोंदूगिरीच्या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत याबाबत लक्षवेधी मांडून संजय गेळे यांच्यावर कडक कारवाई करावी व त्याच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेळे बंधूंच्यावर कारवाई करून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगितले. आटपाडी शहरातील वरद हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात धर्मांतराच्या उद्देशाने घुसून त्यांनी केलेल्या भोंदूपणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी, काल गुरुवारी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडून गेळेच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली. तर, आटपाटीत गेळे बंधूनी बेकायेशीर धर्मांतर आणि चर्च बांधकाम झाल्याचेही सभागृहात सांगितले. पडळकरांनी मांडलेल्या लक्षवेधीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत गेळे कुटुंबाच्या मार्फत होणारे धर्मांतर आणि चर्चच्या बांधकामाबाबत शासनामार्फत चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही दिली.

तत्पूर्वी, लक्षवेधी मांडताना पडळकर म्हणाले की, आटपाडीत संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघे लोकांच्या अज्ञानाचा आणि भोळेपणाचा फायदा घेत आहेत. त्यांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आटपाडीत  बेकायदा चर्च बांधले आहे. धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि बेकायदा चर्चचे बांधकाम काढून टाकावे. गेळे कुटुंबियाकडे आलिशान हॉटेल, जेसीबी आणि पोकलँड मशीन आणि अनेक ठिकाणी जमिनी अशी संपत्ती आहे. ती कशी आली याची चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी केली.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन