गुंड सच्या टारझन स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST2021-06-16T04:37:04+5:302021-06-16T04:37:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : वाळवा येथील गुंड सचिन ऊर्फ टारझन सुभाष चव्हाण (वय २८, राहणार माळभाग) याला आष्टा ...

गुंड सच्या टारझन स्थानबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : वाळवा येथील गुंड सचिन ऊर्फ टारझन सुभाष चव्हाण (वय २८, राहणार माळभाग) याला आष्टा पोलिसांनी स्थानबद्ध केले.
सचिन ऊर्फ टारझन चव्हाण याच्यावर जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याने आपली टोळी तयार करून दहशत पसरवली आहे. त्यामुळे महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड प्रतिबंध कायद्यांतर्गत त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यास पोलीस निरीक्षक अजित सिद, मनोज सुतार, अवधूत भाट, योगेश जाधव, उदय पाटील, परवीन मुल्ला, अरुणा शिंदे यांनी ताब्यात घेऊन सांगली जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले.