शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:57 IST

दलित कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे जातीविषयक चर्चासत्र ऐनवेळी रद्द केल्याने केला निषेध

सांगली : दलित कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे जातीविषयक चर्चासत्र ऐनवेळी रद्द केल्याबद्दल गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा रिपब्लिकन स्टुडंट युनियनने आज, सोमवारी निषेध करीत निदर्शने केली.युनियनचे प्रमुख अमोल वेटम व स्वप्नील खांडेकर यांनी याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे की, एक्वॅलिटी हबच्या प्रमुख व दलित नागरी हक्क कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे अमेरिकेत ‘गुगल’च्या प्लॅटफॉर्मवर चर्चासत्र आयोजित केले होते. गुगलमधील वरिष्ठ अधिकारी तनुजा गुप्ता यांनी हे चर्चासत्र आयोजित केले होते.‘गुगल’मधील ८ हजार मनुवादी कर्मचाऱ्यांनी सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडे हे चर्चासत्र रोखण्याची मागणी केली आणि पिचाई यांनी या महिला दलित वक्त्याला हिंदूविरोधी संबोधित करून त्यांचे नियोजित चर्चासत्र रद्द केले. या घटनेचा संपूर्ण जगात निषेध होत आहे. त्यामुळे सुंदर पिचाईंसह ८ हजार कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.आंदोलनात स्टुडटंस युनियनचे प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख स्वप्नील खांडेकर, तानाजी जाधव, राम नंदीवाले, निशाताई बचूटे, रोहित वाघमारे, बाबासो तांबे, शिवराज गडदे, आरपीआयचे उपाध्यक्ष दिनेश साबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीgoogleगुगलSundar Pichaiसुंदर पिचई