कोकरुड : शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रमांचा अवलंब करून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक काम करतात, त्यांची प्रशासनाकडून निश्चितपणे दखल घेतली जाते, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मणदूर (ता. शिराळा) येथील रमण दगडू खबाले यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
नाईक म्हणाले, शिक्षकांनी आपल्या शाळेच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले; तर निश्चितपणे आपल्या शाळेचे नाव राज्यभर चमकायला वेळ लागणार नाही.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने, विस्ताराधिकारी प्रकाश शिंदे, लताताई खबाले, वैभव माळी, प्रतीक खबाले आदी मान्यवर उपस्थित होते.