शहरं
Join us  
Trending Stories
1
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
2
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
3
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
4
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
5
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
6
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
7
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
8
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
9
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
10
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
11
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
12
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
13
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
14
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
15
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
17
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
18
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
19
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
20
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर फक्त १.४८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:56 IST

CoronaVIrus Sangli : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी मृत्यूदर मात्र अवघा १.४८ टक्के आहे. कोरोनाबाधितांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढण्यात आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत असल्याचे दिलासादायी चित्र आहे.

ठळक मुद्दे संसर्गाचे प्रमाण १३.३८ टक्के, आठवडाभरात १७१५ रुग्ण बरे झाले रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून खेचण्यात डॉक्टरांना यश

संतोष भिसे सांगली : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी मृत्यूदर मात्र अवघा १.४८ टक्के आहे. कोरोनाबाधितांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढण्यात आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत असल्याचे दिलासादायी चित्र आहे.कोरोनाच्या दुसर्या लाटेचा फैलाव वेगाने होत असला तरी तरी बरे होणार्यांची संख्याही लक्षणीय आहे. ११ ते १६ एप्रिल या सहा दिवसांत ४ हजार २३६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्याचवेळी १ हजार ७१५ रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. म्हणजे बाधितांच्या तुलनेत बरे होणार्यांची टक्केवारी सुमारे ४९ टक्के आहे. या कालावधीत दररोज कोरोनाने मृत्यू होणार्यांची संख्यादेखील वीसपेक्षा कमी आहे. या कालावधीत ६३ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील बहुतांश रुग्ण व्याधीग्रस्त होते. कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत मरणारे फक्त १.४८ टक्के इतकेच आहेत.१ जानेवारीपासून आजअखेर मृत्यूचे प्रमाण १.४१ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर मात्र फारच कमी असल्याची दिलासा देणारी बाब पुढे आली आहे. व्हेन्टिलेटर बेड, प्राणवायू आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स या सर्वांची टंचाई असतानाही रुग्णांना मृत्यूपासून रोखण्यात डॉक्टर यशस्वी ठरत आहेत.चाचण्यांचे प्रमाणदेखील वाढविले आहे. आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲन्टीजेनच्या दररोज सरासरी तीन हजार चाचण्या केल्या जात आहेत, त्यामध्ये एका दिवसाची सर्वाधिक रुग्णसंख्या ९२१ इतकी आहे.११ ते १६ एप्रिलदरम्यान

                               बाधित   बरे झालेले    मृत 

  • ११ एप्रिल             ४८७       २४१                 ५
  • १२ एप्रिल             ५२६       २७७                 ६
  • १३ एप्रिल             ६५७      २६७                 १०
  • १४ एप्रिल            ७६२       ३१४                १०
  • १५ एप्रिल           ९२१        २४५               १७
  • १६ एप्रिल           ८८३        ३७१                १५

पहिल्या लाटेपासूनचा जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा मृत्यूदर ३.२८ टक्के आहे. गेल्या १ जानेवारीपासून तो कमी झाला असून १.४१ टक्क्यांवर आहे. टक्केवारी निश्चित करण्याची सध्याची पद्धत एकूण बाधित आणि त्यातील मृत्यू या पद्धतीची असल्याने प्रमाण जास्त दिसते. गंभीर व्याधीग्रस्तांचा विचार केल्यास मृत्यूची टक्केवारी आणखी कमी होईल.- डॉ. संजय साळुंखे,जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSangliसांगली