‘लोकमत’तर्फे सुदृढ बालक स्पर्धा

By Admin | Updated: August 12, 2015 23:28 IST2015-08-12T23:28:34+5:302015-08-12T23:28:34+5:30

जॉन्सन्स बेबी’ प्रायोजक : आज सांगलीतील कच्छी जैन भवन येथे आयोजन

Good luck in the competition by 'Lokmat' | ‘लोकमत’तर्फे सुदृढ बालक स्पर्धा

‘लोकमत’तर्फे सुदृढ बालक स्पर्धा

सांगली: सुदृढ आणि स्वस्थ बाळांचे कौतुक करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे जॉन्सन्स बेबी व इंडियन अकॅडमी आॅफ पेडिअ‍ॅट्रिक्सच्या सहकार्याने गुरुवारी (दि. १३) सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बाळाचे आरोग्य आणि पालनपोषणाबाबतची जागरूकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. गुटगुटीत बाळाच्या चेहऱ्यावरील हास्यापेक्षा आई-वडिलांना अधिक मौल्यवान काय असू शकते? परंतु या नाजूक जिवाची काळजी घेणे हे फार जिकिरीचे काम असते. एक शतकापासून ‘जॉन्सन्स बेबी’ची सर्व उत्पादने लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मातांची आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पहिली पसंती राहिली आहेत. वैद्यकीय परीक्षणांतून सिद्ध झालेली ‘जॉन्सन्स बेबी’ची सर्व उत्पादने बाळाच्या अत्यंत नाजूक त्वचेला सहन होतील, अशीच तयार केली जातात.
लहान बाळाचे डोळे, त्वचा आणि केस यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देऊन सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशी तिहेरी लाभयुक्त (जॉन्सन्स बेबी ट्रिपल बेबी प्रोटेक्शन) उत्पादने पालकांचा विश्वास टिकवून आहेत.
बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून पालकांनी त्याला सर्व संकटांपासून वाचविण्याचे वचन दिलेले असते. त्या वचनपूर्ततेसाठी ‘जॉन्सन्स’ सर्वश्रेष्ठ उत्पादनांसह सदैव तत्पर आहे. इंडियन अकॅडमी आॅफ पेडिअ‍ॅट्रिक्स (आयएपी), सांगली ही मुलांच्या आरोग्य विकासासाठी कार्य करणारी भारतातील बालचिकित्सकांची सर्वांत मोठी संस्था आहे. या स्पर्धेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आयएपी’ सांगली शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. एस. हिंगमिरे यांच्याकडून करण्यात आले आहे. स्पर्धेस डॉ. कुल्लोळी इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग, विश्रामबाग यांचे सहकार्य लाभत आहे.
ही स्पर्धा ० ते १, १ ते ३ वर्षे आणि ३ ते ५ वर्षे अशा तीन गटांत होणार आहे. प्रत्येक गटातील स्पर्धकांना आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. सर्व स्पर्धकांनी बाळाचा जन्मदाखला, वयाचा पुरावा आणि वैद्यकीय उपचार व लसीकरणाची कागदपत्रे नावनोंदणी करतेवेळी सादर करणे गरजेचे आहे. ही स्पर्धा कच्छी समाज जैन भवन, सांगली-मिरज रोड, सांगली येथे गुरुवारी दुपारी दोन वाजता होणार असून, नावनोंदणीसाठी ‘लोकमत’ कार्यालय, कलाश्री आर्केड बिल्डिंग, दुसरा मजला, राममंदिर चौक, सांगली येथे तसेच ९६०४०८८३८८ किंवा ०२३३-२६२५९६२/ ३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Good luck in the competition by 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.