निगडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:30+5:302020-12-11T04:54:30+5:30

शिराळा : निगडी (ता. शिराळा) येथील लिंबाचे टेक परिसरात प्रकाश पाटील यांची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. त्यांच्या शेतात ...

Goat killed in leopard attack at Nigdi | निगडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

निगडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

शिराळा : निगडी (ता. शिराळा) येथील लिंबाचे टेक परिसरात प्रकाश पाटील यांची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. त्यांच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत.

धनाजी पाटील यांचे लिंब टेक परिसरात जनावरांचे शेड आहे. त्या शेडच्या भिंतीवरील कुडातून बिबट्याने मध्यरात्री आत प्रवेश करून शेळीवर हल्ला केला. दोरीने बांधल्याने शेळीला ओढून नेता आले नाही. प्रकाश पाटील सकाळी शेडमध्ये गेले असता, त्यांना शेळी मृतावस्थेत आढळून आली. शेड परिसरातील शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत.

वन विभागाने पंचनामा केला असून वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक देवकी ताशीलदार, प्रकाश पाटील, धनाजी पाटील, मयुरेश भालेकर, विश्वास साळुंखे, राजू पाटील, कोतवाल आकाश मदने, सुधीर पाटील उपस्थित होते.

यापूर्वीही अनेक वेळा निगडी परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन झाले असल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Goat killed in leopard attack at Nigdi