शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतील वीज निर्मितीचे पाणी शेतीला द्या -: अरुण लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:17 IST

दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाकडे मागणी; ४.३४ टीएमसी पाणीसाठा

सांगली : दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पाण्यापासूनची वीज निर्मिती बंद करून त्याऐवजी पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील विजेचा वापर वाढविण्याची विनंतीही त्यांनी केली.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही त्यांनी, कोयनेतील पाण्याचा विजेसाठी होणारा वापर थांबविण्याची मागणी केली.अरुण लाड म्हणाले की, कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भाग ओलिताखाली आला आहे. धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे. पैकी वीज निर्मितीसाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाणी आरक्षित आहे. त्यापैकी ६३.१६ टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी झाला आहे. सध्या वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवलेल्यापैकी ४.३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्याचा वापर वीज निर्मितीसाठी न करता, ते पाणी शेती आणि पिण्यासाठी देण्याची गरज आहे. मान्सूनचा पाऊस कधी येणार, हे निश्चित नसून, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची जिल्ह्यात आणखी टंचाई निर्माण होणार आहे. हे लक्षात घेऊनच प्रशासनाने पाण्यापासून वीज निर्मितीपेक्षा पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील वीज वापराला अधिक पसंती देण्याची गरज आहे. सौरऊर्जा निर्मितीलाही प्रोत्साहन दिल्यास भविष्यातील पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होईल. मेअखेरपर्यंत एकही वळीव पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. हे लक्षात घेऊनच शेतीसाठी कोयनेतून जादा पाणी सोडण्याची गरज आहे. निवेदन देताना इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष जे. पी. लाड, अशोक पवार, विश्वास पवार उपस्थित होते.

दुष्काळाचे संकटजिल्ह्यातील दहापैकी पाच तालुके भीषण दुष्काळाच्या संकटात आहेत. या तालुक्यांत पिण्याचे पाणीही वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तेथे वेळेवर आणि स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊनच कोयनेतील वीज निर्मितीसाठीचे आरक्षित पाणी शेती आणि पिण्यासाठी वळविण्याच्यादृष्टीने गांभीर्याने विचार करावा, असेही लाड यांनी सांगितले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगलीKoyana Damकोयना धरणwater transportजलवाहतूक