पाकिस्तान का नाम मिटा दो : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:55 PM2019-02-15T23:55:14+5:302019-02-15T23:57:13+5:30

काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम

 Give Pakistan the name: Devendra Fadnavis | पाकिस्तान का नाम मिटा दो : देवेंद्र फडणवीस

तासगाव येथे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार अनिल बाबर, माजी आमदार नितीन शिंदे, पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजयकाका पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुरेश खाडे, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, रमेश शेंडगे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देदहशतवादी कृत्याचा तीव्र शब्दात निषेध

तासगाव : काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम मिटा दो पाकिस्तान का’, अशा तीव्र शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानविरोधी संपात व्यक्त केला.

काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे सावट शुक्रवारी तासगावातील पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमावरही दिसून आले. सत्कार-समारंभाला फाटा देत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मनोगत व्यक्त केलेल्या सर्वच मंत्र्यांनी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाब्दिक हल्ला चढविला. पाकिस्तान भिकारी झालाय. त्यांचा पंतप्रधान जगभर कटोरा घेऊन फिरतोय. दुसरीकडे असे भ्याड हल्ले करतो. शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही, आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. गनिमीकाव्याने कसा बदला घ्यायचा हे सांगायची गरज नाही. सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही ते करून दाखवलंय.

मला उतरवायचा आहे पाकचा माज : आठवले
खास कवितांसाठी प्रसिध्द असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी, ‘तासगावमध्ये मी आलो आहे आज, कारण मला उतरवायचा आहे पाकिस्तानचा माज...’ अशा काव्यपंक्ती सादर करून पाकिस्तानवर कॉव्यबॉम्बमधून निशाणा साधला.

आठवले यांनी कवितेतूनच थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांवरच हल्ला चढवला. ‘हल्ले केले जातात, का वाटत नाही लाज, नरेंद्र मोदी तोडून टाकणार आहेत इम्रान खानचा माज’; ‘आज मला फोडावा लागेल पाकिस्तानचा डोळा, फिरवावा लागेल पाकिस्तानवर पेटलेला बोळा’, अशा शब्दात पाकिस्तानवर शब्दहल्ला चढवून त्यांनी निषेध व्यक्त केला. भारताबरोबर जिंंकायची पाकिस्तानची ताकद नाही. आम्ही वाघ आहोत, पाकिस्तान उंदरासारखे आहे. निवडणुकीच्यावेळी निवडणुका, पण देशासाठी आम्ही एकसंध असल्याचे आठवले यांनी सांगितले. पाकिस्तानवर काव्यहल्ला करणाऱ्या आठवलेंच्या कवितेला उपस्थितांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.


 

Web Title:  Give Pakistan the name: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.