शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

साखरेची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:16 PM

सांगली : साखर कारखानदारांनी साखरेला मिळणारे सर्व पैसे ऊस उत्पादकांना द्यावेत, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ...

सांगली : साखर कारखानदारांनी साखरेला मिळणारे सर्व पैसे ऊस उत्पादकांना द्यावेत, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत करण्यात आली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचा ठरावही या परिषदेत करण्यात आला.सांगलीत शुक्रवारी टिळक स्मारक मंदिरात शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाली. या परिषदेस सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले, पुणे जिल्हाप्रमुख आबासाहेब ताकवणे, पुणे पूर्वचे प्रमुख सूरज काळे, सातारा जिल्हाप्रमुख बाळासाहेब चव्हाण, लक्ष्मण रांजणे, शीतल राजोबा, शरद गद्रे, सुनील फराटे आदी उपस्थित होते.संजय कोले म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून केवळ पहिल्या उचलीवर चर्चा करून शेतकºयांची फसवणूक केली जात आहे. गुजरात पॅटर्ननुसार साखर विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. आमच्या संघटनेकडून आजपर्यंत ऊस परिषदेत जे भाकीत केले आहे, तेच घडले आहे.आम्ही गेल्यावर्षी गुजरात येथील गणदेवी पॅटर्ननुसार दराची मागणी केली होती. आता यावर्षी काही कारखानदार या विषयावर सकारात्मकपणे बोलू लागले आहेत. ऊस दराबाबत सध्या साखरेचे ७५ टक्के शेतकºयांना आणि २५ टक्के रक्कम कारखान्याला, तर उपपदार्थातील ७० टक्के शेतकºयांना आणि ३० टक्के कारखान्याला, असा फॉर्म्युला आहे. मात्र तो आता कालबाह्य झाला आहे. आता गणदेवी कारखान्याप्रमाणे साखरेचे शंभर टक्के पैसे ऊसदर म्हणून द्यावेत. सप्टेंबरअखेर जी रक्कम मिळेल, ती संपूर्ण द्यावी. उद्योगांना साखरेऐवजी काकवी द्यावी. त्यामुळे शेतकºयांना चांगले पैसे मिळतील. हा फॉर्म्युला कारखानदारांनी वापरावा.पुढे म्हणाले की, ऊस गाळपातून मिळणाºया उपपदार्थांवर कारखाना चालवावा, बगॅस, प्रेसमड, इथेनॉल, अल्कोहोल यासारख्या उपपदार्थातून कारखाने नफ्यात चालतात, हे गणदेवी कारखान्याने सिद्ध केले आहे. ऊस आंदोलन करताना ३५०० ते ३६०० रुपये मागायचे आणि कमी रकमेत तडतोड करायची, ही प्रथा काही संघटनांनी सुरू केली आहे. हा उद्योग आता बंद करावा.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी मागील पंधरा वर्षात किती शेती केली, कुठे-कुठे ऊस लावला, त्यांच्या उसातून किती उत्पन्न मिळाले, हे सर्वांना माहीत आहे. ऊस न लावता सदाभाऊ आणि शेट्टींनी कोट्यवधींची संपत्ती केली आहे. दोन्ही नेते शेतकºयांच्या हातात पैसे मिळवून देत नसून कारखानदारांना पैसे मिळवून देण्याचा धंदा करतात. त्यामुळे दोघांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कोले यांनी केली.मुख्यमंत्र्यांची घोषणा वाºयावरची वरातकोडोली येथे झालेल्या ऊस परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले साखरेचा हमीभाव २९०० ऐवजी ३२०० रुपये करण्याचे आश्वासन, तसेच शेतकºयांची पै न् पै देण्याची ग्वाही म्हणजे वाºयावरची वरात आहे. त्यांनी केलेल्या घोषणेतून काहीही मिळणार नसल्याचेही संजय कोले यांनी सांगितले.मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाहीगतवर्षी २०१७-१८ च्या एफआरपीप्रमाणे ऊसबिल न दिलेल्या कारखान्यांनी ते सात दिवसात देण्यास शासनाने भाग पाडावे, अन्यथा जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही. शनिवारपासूनच मंत्र्यांच्या गाड्या संघटनेचे कार्यकर्ते अडविणार आहेत, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिला.शेअर्स ठेवी, पूर्ण करावसंतदादा कारखान्याने पाच हजाराचा शेअर्स दहा हजार केला आहे. उर्वरित पाच हजार रुपये भरण्याच्या नोटिसा शेतकºयांना आल्या आहेत. सभासदांच्या ठेवी आणि व्याजाचे मिळून कारखान्याकडे ११० कोटी रुपये पडून आहेत. ठेवी आणि व्याजाच्या रकमेतून सभासदांचा शेअर्स पूर्ण करावा, अशी मागणीही ऊस परिषदेत करण्यात आली. कारखान्याच्या २०१३-१४ मधील उसाची बिले आठ दिवसात न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला.